
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Actor Karthik Aryan)आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची छाप पडली आहे. कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांच्या (Fans) सोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावरही (Social media )बराच सक्रिय असलेला दिसून येतो. चाहतेही त्याच्यावर भरभरून प्रेम करताना दिसून येतात. अनेकदा आपल्या स्टारडमची तमा न बाळगता कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांना अतिशय सहज आणि सभ्यतेने भेटतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो आपल्या छोट्या चाहत्याला भेटताना दिसून आला आहे.
कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन विमातळावर असताना एक छोटा चाहता त्याला जोर जोरात आवाज देताना दिसून आला आहे. या मुलाला सुरक्षा रक्षक आत सोडत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र मुलाच्या आवाजानंतर स्वतः कार्तिक आर्यनने मुलाला आत सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्याने स्वतः त्या मुलाच्या सोबत फोटो काढला, कोणत्याही प्रकारचा अभिनवेश न बाळगता कार्तिक आर्यन मुलाला भेटला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून आर्यनच्या कृतीचे चाहते कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनीही यावर कमेंटचा पाऊस पडला आहे.
फ्लाइट चुकल्याची पर्वा न करता कार्तिक आर्यन गेला आणि त्याच्या चाहत्याला भेटला आणि त्याच्यासोबत फोटोही काढले. यानंतर कार्तिक आर्यनच्या या चिमुकल्या चाहत्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे होते. यापूर्वीही कार्तिक आर्यन एका तरुण चाहत्याशी बोलताना दिसला होता. त्यावेळी त्याने ‘भूल भुलैया 2’ चा गेटअप केला होता. यापूर्वी कार्तिक आर्यन एकदा त्याच्या 2 लेडीज चाहत्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर आला होता.