Drishyam 3 Teaser: अक्षय खन्नाला पुन्हा टक्कर देण्यास अजय देवगण सज्ज! दृश्यम 3चा टीझर पाहिलात का?
Drishyam 3 Release Date: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा दृश्यम 3 हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाबाबात जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. तसेच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडमधील उत्कृष्ठ चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे दृश्यम. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या चित्रपटात अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. मुलीला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी अजय देवगण सर्व मर्यादा ओलांडताना दिसतो. या चित्रपटाचा आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगणे सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयी माहिती समोर आली आहे.
अजय देवगनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘दृश्यम ३’ बद्दल मोठी घोषणा झाली आहे. अभिनेता पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्यास तयार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. “दृश्यम ३, दृश्यम डे… शेवटचा भाग बाकी आहे. सिनेमाघरात २ ऑक्टोबर २०२६ रोजी पाहू शकता” या आशयाचे कॅप्शन अजय देवगणने दिले आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ काय आहे? (Drishyam 3 Teaser)
दृश्यम ३ च्या व्हिडीओमध्ये अजय आपल्या कुटुंबाला वाचवण्याबद्दल बोलत आहे. या टीजरमध्ये मागील दोन्ही चित्रपटांमधील काही सीनही दाखवले आहेत. टीजरमध्ये तो म्हणतो – “जग मला अनेक नावांनी ओळखते, पण मला फरक पडत नाही. कारण गेल्या ७ वर्षांत जे काही घडले आणि जे मी केले, जे पाहिले आणि जे दाखवले, त्यातून मला एक गोष्ट समजली. या जगात प्रत्येकाचे सत्य वेगळे आहे. प्रत्येकाची बरोबरची व्यख्या वेगळी आहे. माझे सत्य, माझे बरोबर फक्त माझे कुटुंब आहे. जो पर्यंत सर्व थकत नाहीत, जोपर्यंत सर्व हारत नाहीत, तो पर्यंत मी येथे उभा आहे चौकीदार म्हणून. एक भिंत म्हणून. कारण कथा अजून संपलेली नाही. शेवटचा भाग बाकी आहे.”
दृश्यम ३ ची स्टारकास्ट
चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत आहेत. श्रेया सरन त्याच्या पत्नीच्या भूमिकेत, इशिता दत्ता त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. चित्रपटात अभिषेक पाठक, कुमार मंगत, आलोक जैन यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाबद्दल प्रेंक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. दृश्यमच्या मागील दोन्ही भागांना प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. पहिला भाग २०१५ मध्ये आला होता आणि दुसरा २०२२ मध्ये. अजय देवगनचा दृश्यम हा मोहनलालच्या दृश्यमचा रीमेक आहे.
