AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif : सुंदर दिसण्यापेक्षा… बॉडी शेमिंगदरम्यान कतरिनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; सांगितलं खरं सौंदर्याचं गमक

बाळंतपणानंतरच्या शारीरिक बदलांवरून कतरिना कैफला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. तिने आता मौन सोडत मुलाखतीत मातृत्वानंतरच्या त्वचेतील बदल आणि सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

Katrina Kaif : सुंदर दिसण्यापेक्षा...  बॉडी शेमिंगदरम्यान कतरिनाने पहिल्यांदाच सोडलं मौन; सांगितलं खरं सौंदर्याचं गमक
| Updated on: Sep 18, 2026 | 3:42 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सवादरम्यान, बाळाच्या जन्मानंतरच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर ती पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसून आली. कतरिनाने पती विकी कौशलसोबत नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मुलाचे, विहानचं स्वागत केलं होतं. या काळात, काही सोशल मीडिया युजर्सनी कतरिनाचे गरोदरपणापूर्वीचे आणि नंतरचे फोटो शेअर करून तिच्या दिसण्यातील बदलांची तुलना केली . एवंच नव्हे तर तिच्या शरीराबाबत भाष्य केले; यामुळे अभिनेत्रीला ‘बॉडी-शेमिंग’चा मोठ्या प्रमाणात सामान करावा लागला. मात्र अनेक जणांनी तिला पाठिंबा दिला. अभिनेता अली जफर, सोनारिका भदोरिया आणि शिवलिका ओबेरॉय यांसारख्या कलाकारांनी यासंदर्भात कतरिनाला पाठिंबा दर्शवला. अंबानींच्या गणेशोत्सवातही कतरिना विकीसोबत आली होती, मात्र तिच्या लूक वरून बरीच उलटसुलट चर्चा झाली, तिला ट्रोल करण्यात आलं.

या सर्वांदरम्यान आत्तापर्यंत कतरिनाने मौन बाळगलं होतं, पण आता तिने एका मुलाखतीत मातृत्वानंतर आपल्या त्वचेत झालेले बदल आणि स्वतःच्या दिसण्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन यावर भाष्य केलं आहे. माझ्यासाठी सुंदर दिसणं म्हणजे फक्त वरकरणी चांगलं दिसणं नव्हे, तर आतून चांगले वाटलं पाहिजे, असं ती म्हणाली.

पोस्टपार्टम स्किन चेंजबद्दल काय म्हणाली कतरिना ?

‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कतरिना स्पष्टपणे बोलली. ‘सर्वात उत्तम दिसणे’ म्हणजे तिच्यासाठी काय, हे देखील तिने नेमकेपणानं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘गरोदरपणानंतर माझी त्वचा अधिकच संवेदनशील झाली होती. माझ्यासाठी तो काळ आव्हानात्मक होता, कारण माझ्या त्वचेसाठी कोणती उत्पादनं योग्य आहेत हे मला शोधून काढावं लागत होतं. मी अशी उत्पादने शोधत होते जी माझ्या त्वचेला आराम देतील आणि त्वचेचं आरोग्य पूर्ववत करण्यास मदत करतील’ असं कतरिना म्हणाली,

खरं सौंदर्य म्हणजे काय ?

बॉलिवूडमध्ये आल्यापासून ‘सर्वात उत्तम दिसणं’ याबद्दलची माझी व्याख्या बऱ्याच अंशी बदलली आहे, असं कतरिना कैफने सांगितलं. ” जेव्हा मी मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, तेव्हा सौंदर्याचे काही ठराविक निकष होते. पण आता, ‘सर्वात उत्तम दिसणे’ ही गोष्ट ‘सर्वात उत्तम वाटणे’ याच्याशी जोडली गेली आहे. आणि उत्तम वाटण्यासाठी मी स्वतःची पूर्णपणे काळजी घेण्यावर भर देते.” असं कतरिनाने नमूद केलं.

कतरिना कशी घेते स्वत:ची काळजी ?

स्वतःला अधिक चांगलं वाटावं यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन करते, हे देखील कतरिनाने सांगितले. ” संतुलित आहार घेणे, शरीरातील दाह (inflammation) नियंत्रणात ठेवणं, ॲक्टिव्ह राहणं, मेडिटेशन, सकाळी एक तास फोनपासून दूर राहणं आणि उठल्याबरोबर नैसर्गिक सूर्यप्रकाश घेणं— या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. याचा प्रभाव माझ्या त्वचेवरही दिसून येतो. माझा असा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही आतून निरोगी असता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वातून दिसून येतो” असं कतरिनाने नमूद केलं.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं