AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3360 कोटींची मालकीण, मोठा नेता तिच्यावर फिदा, 4 महिन्यांपासून मन जिंकण्याचा प्रयत्न; अखेर मिळाला होकार

तब्बल 400 दशलक्ष डॉलर संपत्तीची मालकीण असलेल्या या जगप्रसिद्ध गायिकेवर मोठा नेता फिदा झाला. चार महिन्यांपासून तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अखेर त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

3360 कोटींची मालकीण, मोठा नेता तिच्यावर फिदा, 4 महिन्यांपासून मन जिंकण्याचा प्रयत्न; अखेर मिळाला होकार
3360 कोटींची मालकीण, मोठा नेता तिच्यावर फिदाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 1:20 PM
Share

अमेरिकन पॉप स्टार केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. तब्बल 400 दशलक्ष डॉलर (जवळपास 3360 कोटी रुपये) संपत्तीची मालकीण असलेली केटी पेरी ही जगप्रसिद्ध गायिका आणि गीतलेखिका आहे. या दोघांचा एका यॉटवर किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय. ‘पिपल मॅगझीन’च्या वृत्तानुसार, सुरुवातीला केटी पेरीच्या मनात या डेटिंगबद्दल बऱ्याच शंका होत्या. परंतु गेल्या चार महिन्यांपासून जस्टीन ट्रुडो यांनी तिचं मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले. जुलै महिन्यात या दोघांना सर्वांत आधी एकत्र पाहिलं गेलं होतं.

जुलै 2025 मध्ये एकत्र डिनरला गेल्यानंतर जस्टिन केटीच्या मागेच लागले होते, असाही दावा या वृत्तात करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर तिला भेटायला ते कॅलिफोर्नियालाही गेले होते. हळूहळू दोघांच्या आवडी-निवडी जुळू लागल्या आणि त्यांच्यात सहज मैत्री झाली. याचं मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात झाल्याचं जगजाहीर आहे. जुलै 2025 मध्ये या दोघांना मॉन्ट्रियलमध्ये एकत्र डिनर करताना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर माऊंट रॉयल पार्कमध्ये दोघं फिरताना दिसले. केटी पेरीच्या टूरमध्येही जस्टीन यांना पाहिलं गेलं होतं. या दोघांच्या वयात 13 वर्षांचं अंतर आहे. जस्टीन 53 वर्षांचे असून केटी 40 वर्षांची आहे.

यावर्षी जून महिन्यात केटी पेरीने ऑरलँडो ब्लूमशी साखरपुडा मोडला होता. त्याच्या एक महिन्यानंतर जुलैमध्ये तिला जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत सर्वांत पहिल्यांदा पाहिलं गेलं होतं. केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. तर दुसरीकडे जस्टिन ट्रुडो यांनी लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नी सोफी ग्रेगॉईरला 2023 मध्ये घटस्फोट दिला होता. या दोघांना तीन मुलं आहेत.

केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम यांची पहिली भेट 2016 मध्ये झाली होती. ‘गोल्डन ग्लोब’ या जगप्रसिद्ध पुरस्कार सोहळ्याच्या आफ्टरपार्टीमध्ये दोघं एकमेकांना भेटले होते. त्यानंतर 2019 मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ला त्यांनी साखरपुडा केला होता. त्याच्या वर्षभरातच 2020 मध्ये केटीने मुलीला जन्म दिला. केटी आणि ऑरलँडो यांच्या मुलीचं नाव डेझी डव्ह ब्लूम असं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.