AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहबंधनात अडकल्यानंतर Kiara Advani – Sidharth Malhotra यांच्या लग्नाची पत्रिका समोर

तुम्ही पाहिली आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी यांच्या लग्नाची पत्रिका ; लग्नाच्या फोटोंनंतर पत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल

विवाहबंधनात अडकल्यानंतर  Kiara Advani - Sidharth Malhotra यांच्या लग्नाची पत्रिका समोर
Kiara Advani and Sidharth Malhotra wedding card
| Updated on: Feb 08, 2023 | 1:26 PM
Share

Kiara Advani – Sidharth Malhotra : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांचा ७ फेब्रुवारी रोजी शाही अंदाजात विवाह सोहळा पार पडला. किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगत आहे. सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण कोणीही नव्या कपलसोबत फोटो पोस्ट केला नाही. कारण किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्यात आली होती. शिवाय सेक्यूरिटी बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. आता दोघांच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहे.

लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. अगदी साधी आणि सुंदर अशी किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची पत्रिका आहे. सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्न पत्रिकेत विवाह आणि विवाहापूर्वच्या सोहळ्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Kiara Advani and Sidharth Malhotra wedding card

लग्नाच्या फोटोंमध्ये किआरा – सिद्धार्थ दोघे पती – पत्नीच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत होते. गेल्या अनेक वर्षांपासून किआरा – सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. पण कधीही दोघांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली नाही. पण ७ फेब्रुवारी रोजी लग्नाचे फोटो पोस्ट करत दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.

अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नात किआरा हिने बेबी पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. तर सिद्धार्थ याने रुबाबदार शेरवानी घातली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड सुंदर दिसत आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत किआरा हिने कॅप्शनमध्ये, ‘आता आमची कायमची बुकिंग झाली आहे…’ असं लिहिलं आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. (kiara advani sidharth malhotra wedding)

‘शेहशाह’ सिनेमानंतर दोघांना एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सिद्धार्थ – किआरा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेले होते.. पण आता दोघांना पती – पत्नीच्या रुपात पाहून चाहत्यांना देखील मोठा आनंद झाला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...