कियारा अडवाणीची हुबेहूब कॉपी आहे ‘गांधी गोडसे’ची हिरोइन; फोटो पाहून सिद्धार्थ मल्होत्राही होईल थक्क!

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी हिने नुकतंच 'गांधी गोडसे- एक युद्ध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

| Updated on: Feb 01, 2023 | 4:30 PM
1 / 5
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी हिने नुकतंच 'गांधी गोडसे- एक युद्ध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी हिने नुकतंच 'गांधी गोडसे- एक युद्ध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2 / 5

तनिषाचा हा चित्रपट जेव्हापासून चर्चेत आला आहे, तेव्हापासून तिच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. तनिषा ही हुबेहूब अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

3 / 5

तनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'फटा पोस्टर निकला हिरो' या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

4 / 5

आता वडील राजकुमार संतोषी यांच्याच चित्रपटातून तनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. गांधी गोडसे या चित्रपटातील भूमिकेसाठी तनिषाने वडिलांकडेच ऑडिशन दिलं आणि त्यानंतर तिची निवड झाली. कारण राजकुमार संतोषी यांना त्यांच्या मुलीला स्वत:च्याच चित्रपटातून लाँच करायचं नव्हतं.

5 / 5

गांधी गोडसे या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा लाँच झाला, तेव्हा तनिषाला अश्रू अनावर झाले होते. चित्रपटातील ती भूमिका आपल्याला करू द्यावी, अशी विनंती तिने वडिलांकडे केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us