AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ…

छोट्या पडद्यावर गाजत असलेला शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12).  सध्या या कार्यक्रमाचे 12वे पर्व सुरु असून, हा कार्यक्रम सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी या मंचावर हजेरी लावली असून, स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ...
अरुणिता कांजीलाल
| Updated on: Mar 19, 2021 | 1:59 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजत असलेला शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12).  सध्या या कार्यक्रमाचे 12वे पर्व सुरु असून, हा कार्यक्रम सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी या मंचावर हजेरी लावली असून, स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक आणि गायिका अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिच्या गोड गळ्याने आणि सुमधुर आवाजाने अरुणिता सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते (Know About Indian idol 12 Contestant Arunita Kanjilal).

नुकत्याच एका भागात अरुणिताने ‘तुने ओ रंगीले कैसा जादू किया…’ आणि ‘मेरे नसीब मे तू हे के नही…’ ही दोन गाणी गायली. यावेळी तिला सगळ्या परीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. तिच्या या गाण्याने उपस्थित प्रेक्षकांसह, परीक्षकही मंत्रमुग्ध झाले होते.

ऐका अरुणिताचा गोड आवाज!

(Know About Indian idol 12 Contestant Arunita Kanjilal)

सुभाष घईंनीही केले होते कौतुक!

अलिकडे प्रदर्शित झालेल्या भागात अरुणिताने ‘मेरा पिया घर आया’ हे गाणे सादर केले होते. हे गाणे अभिनेत्री माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे गाणे खास पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या सुभाष घई यांना विशेष भावले. त्यामुळे त्यांनी मंचावर येत अरुणिताला खास मोलाचे सल्ले दिले. अरुणिताने गायलेले गाणे ऐकून सुभाष घई यांनी तिला काही खास टिप्स दिल्या. या गाण्यातील माधुरी दिक्षितचा डान्स तुफान लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच या गाण्यासाठी तिने कशा प्रकारे एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव दिले होते, हे सुभाष घई यांनी अरुणिताला शिकवले होते. तसेच, त्यांनी तिचे तोंड भरून कौतुकही केले होते (Know About Indian idol 12 Contestant Arunita Kanjilal).

कोण आहे अरुणिता कांजीलाल?

सध्या इंडियन आयडॉल 12 गाजवत असलेली गायिका अरुणिता 2013मध्ये ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ची (बंगाली) विजेती ठरली होती. त्याच वेळी, ती सारेगामापा लिटील चॅम्प्स 2014ची (हिंदी) फायनलिस्टही होती. सध्या ती पवनदीप राजनबरोबरच्या तिच्या ‘रिलेशनशिप’मुळे बरीच चर्चेत आली आहे.

पवनदीप-अरुणिता चर्चेत

अरुणिता कांजीलाल ‘बंगाली’ तर, पवनदीप राहाण ‘पहाडी’ आहे. पण, ही जोडी आणि त्यांची केमिस्ट्री दोघांच्याही फॅन्सना खूप आवडते. त्यांची ही मैत्री बर्‍याच काळापासून चर्चेचा विषय ठरली आहे. अरुणितामुळे पवनदीप राजन आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचा दावाही केला जात आहे, पण पवनदीपने ते नाकारले आहे.

या चर्चांना उत्तर देताना पवनदीप राजन म्हणाला की, तो आणि अरुणिता फक्त चांगले मित्र आहेत आणि प्रेक्षकांना दोघेही आवडतात. पुढे तो म्हणाला, ‘आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. ही फक्त मैत्री आहे आणि दुसरे कशाचेही नाव देऊ नका.’

(Know About Indian idol 12 Contestant Arunita Kanjilal)

हेही वाचा :

Good News | आयुष्मान खुरानाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, भाऊ अपारशक्ती होणार ‘बाबा’!

Box Office Clash | जॉन अब्राहमची आणखी एका अभिनेत्याशी ‘टक्कर’, बॉक्स ऑफिसवर कोणाची जादू दिसणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.