Good News | आयुष्मान खुरानाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, भाऊ अपारशक्ती होणार ‘बाबा’!

बॉलिवूड अभिनेता अपशक्ती खुराना (Bollywood Actor Aparshakti Khurana) याच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अपारशक्ती लवकरच ‘बाबा’ बनणार आहे.

Good News | आयुष्मान खुरानाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, भाऊ अपारशक्ती होणार ‘बाबा’!
अपारशक्ती खुराना

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अपशक्ती खुराना (Bollywood Actor Aparshakti Khurana) याच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अपारशक्ती लवकरच ‘बाबा’ बनणार आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन होईल. अपारशक्ती त्यांच्या बाळाबद्दल खूप उत्सुक आहे. 2014मध्ये अपारशक्ती खुरानाने त्याची मैत्रीण आकृती आहुजा हिच्याशी लग्न केले होते (Bollywood Actor Aparshakti Khurana and aakriti ahuja expecting first child).

अपारशक्तीच्या बाळाचे आगमन झाल्यानंतर आयुष्मान खुराना ‘बडे पापा’ (मोठा काका) होणार आहे. बाळाच्या चाहुलीसाठी संपूर्ण खुराणा कुटुंब खूप उत्सुक आहे. लहान भाऊ किंवा बहीण येणार असल्याने आयुष्मानची मुलेही खूप खुश आहेत.

‘दंगल’मधून केली सुरुवात!

अभिनेता अपारशक्तीने आपल्या करिअरची सुरूवात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात अपारशक्तीची एक सहायक अभिनेत्याची भूमिका होती, परंतु तरीही या चित्रपटात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर त्याने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘स्त्री’, ‘लुका चुप्पी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. या सर्वांमध्ये तो एक सहायक अभिनेता म्हणून चांगलाच चर्चेत आला आहे. परंतु, त्याचा कारकीर्दीचा आलेख झपाट्याने वाढत आहे.

आयुष्मानपेक्षा कमी नाही शक्ती!

भाऊ आयुष्मानसारखा अपारशक्ती देखील बहुगुणी अभिनेता आहे. तो केवळ अभिनयच नाही तर एक गायक देखील आहे. ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातही अपारशक्ती दिसला होता आणि आता तो ‘हेलमेट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रणुतन बहल अपारशक्तीसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे (Bollywood Actor Aparshakti Khurana and aakriti ahuja expecting first child).

अशाप्रकारे झाली अपारशक्ती-आकृतीची भेट

वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, अपशक्ती आणि आकृती यांची भेट चंडीगडमध्ये एका नृत्य वर्गात झाली होती. दोघेही आधी एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि मग त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2014साली लग्न केले. आकृती ही ‘फेरी इव्हेंट्स’ नावाच्या कंपनीची संस्थापक आहे. तिची आणि अपारशक्ती खुरानाची जोडी खूपच क्युट आहे. दोघेही बर्‍याचदा आपल्या कामापासून दूर राहून एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आरजे होता अपारशक्ती

2016च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या ‘दंगल’ या चित्रपटाद्वारे अपारशक्तीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार’ देण्यात आला होता. यानंतर, ती ‘स्त्री’, ‘लुका चुप्पी’ आणि ‘पति पत्नी और वो’ या लोकप्रिय चित्रपटांमध्येही तो दिसला. सिनेमा जगात प्रवेश करण्यापूर्वी, अपारशक्ती दिल्लीतील एका लोकप्रिय रेडीओ वाहिनीत आरजे म्हणून काम करत होता.

(Bollywood Actor Aparshakti Khurana and aakriti ahuja expecting first child)

हेही वाचा :

Box Office Clash | जॉन अब्राहमची आणखी एका अभिनेत्याशी ‘टक्कर’, बॉक्स ऑफिसवर कोणाची जादू दिसणार?

PHOTO | मौनी रॉय पडलीय दुबईस्थित बँकरच्या प्रेमात, पाहा कोण आहे सूरज नंबियार?

Published On - 1:06 pm, Fri, 19 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI