‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 5 अभिनेते, जाणून घ्या कोणाचं मानधन किती

कोरोनामुळे देशात सहा-सात महिन्यात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु काही बॉलिवूड अभिनेते असे आहेत ज्यांनी कोरोना महामारीच्या काळातही बक्कळ कमाई केली आहे.

1/6
कोरोनाच्या संकटामुळे (COVID-19 Crisis) गेल्या वर्षभरात सामान्य नागरिकांसह देशातील अनेक उद्योगधंद्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने लोकांचे उत्पन्न बंद होते, तर काहींची कमाई अनेक पटींनी कमी झाली आहे. कोरोनाचा चित्रपट उद्योगावरही परिणाम झाला. देशात सहा-सात महिन्यात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु काही बॉलिवूड अभिनेते असे आहेत ज्यांनी कोरोना महामारीच्या काळातही बक्कळ कमाई केली आहे.

2/6
मीडियम डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. अक्षय तब्बल 128 कोटी रुपयांचे मानधन घेतो. नुकताच त्याचा 'लक्ष्मी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आगामी काळात त्याचे 'सूर्यवंशी', 'अतरंगी रे', 'बेल बॉटम', 'पृथ्वीराज', 'राम सेतू', 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

3/6
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान दुसऱ्या स्थानावर आहे. सलमान एका चित्रपटासाठी 105 कोटी रुपये मानधन घेतो. यावर्षी सलमानचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. रमजान ईदच्या दिवशी सलमानचा 'राधे' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

4/6
 ‘पठाण’ या चित्रपटासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खाननं 120 कोटी मानधन घेतलं आहे.

5/6
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान एका चित्रपटासाठी 74 कोटी रुपये मानधन घेतो. पुढील वर्षी आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लाल सिंह चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट 'दी फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

6/6
ऋतिक रोशन शेवटचा 'सुपर 30' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्याअगोदर त्याचा 'वॉर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या दोन्ही चित्रपटाच्या यशामुळे ऋतिकने त्याचे मानधन वाढवले आहे. ऋतिक आता एका चित्रपटासाठी 65 कोटी रुपये मानधन घेतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI