AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी बहीण कृष्णा पोहोचली लग्नाला; भावाबद्दल विचारताच..

भाऊ टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याची बहीण कृष्णा श्रॉफ एका लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होती. यावेळी पापाराझींनी तिला टायगरविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यांना प्रतिक्रिया देणं टाळलं.

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी बहीण कृष्णा पोहोचली लग्नाला; भावाबद्दल विचारताच..
Krishna ShroffImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2026 | 10:05 AM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांची चर्चा सुरू आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजू आणि तान्या सिद्दीकी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिली. मात्र, यावेळी तिने पापाराझींसमोर फोटो काढणं टाळलं. इतकंच नाही, तर टायगरच्या प्रकृतीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही तिने मौन बाळगलं. कृष्णाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजू अर्थात फैजल शेख आणि तान्या सिद्दीकी यांच्या लग्नाचं रिसेप्शन 19 ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडलं. या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि सोशल मीडिया सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कृष्णा श्रॉफदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होती.

या कार्यक्रमासाठी कृष्णाने निळसर हिरव्या रंगाचा लेहंगा, गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि त्याला साजेशी ओढणी असा आकर्षक पेहराव केला होता. तिच्या लूकचीही चर्चा झाली. मात्र, तिच्या स्टाइलपेक्षा तिने पापाराझींना दिलेल्या प्रतिक्रियेने अधिक लक्ष वेधून घेतलं. रिसेप्शनमध्ये उपस्थित असूनही कृष्णाने रेड कार्पेटवर थांबून फोटोग्राफर्सना पोझ देणं टाळलं. कार्यक्रम संपल्यानंतर ती थेट तिच्या कारकडे निघाली.

पहा व्हिडीओ-

18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात फुटबॉल खेळून परतत असताना टायगरच्या कारजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत टायगर सुरक्षित राहिला; मात्र त्याच्या चालकासह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर टायगरच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना होती. अशातच रिसेप्शनमधून बाहेर पडताना पापाराझींनी कृष्णाला टायगरच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारले. मात्र, कृष्णाने या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचं टाळलं. तिने वारंवार ‘थँक यू’ असं म्हणत तिथून निघणं पसंत केलं. तिने भावाच्या प्रकृतीबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य केलं नाही.

टायगरवरील गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, गोळीबारामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, टायगरने या घटनेबाबत स्वतः अधिकृत वक्तव्य केलेलं नसल्याचं वृत्त आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष