Kriti Sanon ‘या’ 5 मर्गांनी कमावते कोट्यवधींची माया, नेटवर्थ जाणून व्हाल अवाक्

Kriti Sanon Net worth: फक्त सिनेमांमधून नाही तर, 'या' 5 मार्गांनी क्रितीची होते गडगंज कमाई, एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 1 कोटी, एका सिनेमासाठी 5 - 8 कोटी, अन्य मार्गांनी होणारी अभिनेत्रीची कमाई थक्क करणारी.., रॉयल आयुष्य जगते अभिनेत्री...

Kriti Sanon या 5 मर्गांनी कमावते कोट्यवधींची माया, नेटवर्थ जाणून व्हाल अवाक्
| Updated on: Jul 29, 2024 | 2:28 PM

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचा कोणी गॉडफादर नाही. तरी देखील त्यांनी अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं आणि चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सनॉन… क्रिती हिने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, करीना कपूर खान, तब्बू आणि वरुण धवन यांच्यासोबत देखील अभिनेत्री झळकली.

सांगायचं झालं तर, क्रिती हिने साऊथ सिनेमातून 2014 मध्ये अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर क्रिती अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत ‘हिरोपंती’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि सिनेमा हीट देखील झाला. क्रिती हिला इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 10 वर्षात अभिनेत्रीने अनेक पुरस्कारांवर देखील स्वतःचं नाव कोरलं.

‘मीमी’ सिनेमानंतर तर अभिनेत्रीच्या प्रसिद्ध आणि लोकप्रियेत मोठी वाढ झाली. आज क्रिती फक्त प्रसिद्ध अभिनेत्री नाही तर, श्रीमंत अभिनेत्री देखील आहे. रिपोर्टनुसार, क्रिती हिची नेटवर्थ तब्बल 82 कोटी आहे. क्रिती एका सिनेमासाठी जवळपास 5 – 8 कोटी रुपये मानधन घेते. क्रिती आज आलिशान आयुष्य जगत आहे.

क्रिती सोशल मीडियावरून देखील कोट्यवधींची कमाई करते. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी अभिनेत्री 1 – 2 कोटी रुपये फी घेते. याशिवाय क्रिती ‘ब्लू बटरफ्लाई फिल्म’ नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची मालकीण देखील आहे. कृती सॅनन ही स्किन केअर ब्रॉन्झ आणि कपड्यांच्या ब्रँडचीही मालकीण आहे.

क्रिती तिच्या कपड्यांच्या ब्रँड हायफनमधून मोठी कमाई करत आहे. तिच्या फॅशन आणि कपड्यांच्या लेबलपैकी एक म्हणजे एमएस टेकन. ती त्याची सह-मालक आहे. याशिवाय क्रिती सेननने टेक स्टार्टअप ट्रिंगमध्येही गुंतवणूक केली आहे आणि येथूनही अभिनेत्री भरपूर पैसे कमावते.

क्रिती सनॉन हिचे सिनेमे

क्रिती सनॉन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आणि ‘क्रू’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि सिनेमे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले. आता अभिनेत्री ‘पत्ती’ सिनेमात दिसणार आहे. ‘पत्ती’ सिनेमात क्रिती अभिनेत्री काजोल हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. शिवाय अभिनेत्री अनुराग कश्यप याच्या आगामी सिनेमात देखील मुख्य भूमितेत दिसणार आहे.