AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosale: संगीत विश्वातील एका ‘अविस्मरणीय’ युगाचा अंत! आशाताई भोसले यांचे निधन

Asha Bhosale Passed Away: आज, 12 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

Asha Bhosale: संगीत विश्वातील एका 'अविस्मरणीय' युगाचा अंत! आशाताई भोसले यांचे निधन
Asha BhosaleImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 1:05 PM
Share

गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सात दशकांपासूनची सुरांची साथ संगत थांबली. आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एका युगाचा अस्त झाला आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतला. विविध भाषेतून तब्बल 12 हजार गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे.

उद्या 4 वाजता होणार अंतिम संस्कार

काल, संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

मुलाने दिली निधनाची बातमी

आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आईच्या निधनाची बातमी दिली आहे. माझी आई आशा भोसले यांचं निधन झालं आहे. उद्या चार वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवणार आहे असे आनंद भोसले यांनी म्हटले आहे.

१९३३ मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. ‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘ये मेरे वतन के लोगो’ (बॅकग्राउंड), ‘क्या करें’ सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले होते. आशा भोसले यांना ‘आशा ताई’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ आणि ‘Queen of Indipop’ अशा उपाधी मिळाल्या होत्या.

Follow Us
पुण्यामध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ
Pune | पुण्याच्या वाकडमध्ये मद्यपी कार चालकाचा हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी
ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
Mumbai Bank | ठाणे बँकेनंतर शिंदे गटाची नजर मुंबई बँकेवर; भाजपाला थेट टक्कर देणार?
नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा
Raju Patil | नादी लागू नका, सगळी यादी बाहेर काढू!; राजू पाटलांचा नेमका कोणाला इशारा? VIDEO होतोय व्हायरल
पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत
Pune | पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; फडणवीस-रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची रणनीती ठरणार?
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! सरकारसमोर नवं आव्हान काय?
tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज चर्चा, कोण कोण जाणार?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज मोठी चर्चा, कोण कोण जाणार?
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम