Lock Upp 2 : बायसेक्शुअल आहे गौरव खन्नाची बायको, आकांशाच्या लैंगिकतेबद्दल कोणाचा दावा?

Lock Upp 2 : बिग बॉस विनर गौरव खन्नाची बायको आकांशा चमोला हिच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह? बायसेक्शुअल आहे आकांशा..., सत्य समोर येताच चर्चांना उधाण.. गेल्या काही दिवसांपासून आकांशा फक्त आणि फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Lock Upp 2 : बायसेक्शुअल आहे गौरव खन्नाची बायको, आकांशाच्या लैंगिकतेबद्दल कोणाचा दावा?
Akanksha Chamola
| Updated on: Jul 01, 2026 | 9:23 AM

Lock Upp: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध आणि विवादित शो ‘लॉकअप: सच या सजा’ मध्ये रोज नवीन काहीतरी मोठं होताना दिसत आहे. रोज स्पर्धक कोणतातरी मोठा खुलासा करतात. पण शोच्या लेटस्ट एपिसोडमध्ये असं काही झालं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्री सर्वत्र खळबळ उडाली आहे. शोमध्ये प्रसिद्ध स्पर्धक आणि इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिने अभिनेत्री आकांशा चमोला हिच्याबद्दल असा एक दावा केला आहे, जे ऐकून प्रत्येक जण थक्क झाला. श्रेयाने कॅमेऱ्यासमोर असा दावा केला की, आकांशा ‘बायसेक्शुअल’ आहे.

हा संपूर्ण वाद तेव्हा सुरु झाला, जेव्हा आकांशा चमोला हिने श्रेया कालरा हिच्या विरोधात ‘चार्जशिट’ दाखल केली आणि तिला डेन्जर झोनमध्ये टाकलं. हेच कारण होतं, ज्यामुळे श्रेया आणि आकांशा यांच्यातील वाद टोकाला पोहोचला. सांगायचं झालं तर, सुरू असलेल्या या वादविवादादरम्यान, श्रेयाने दुसरी स्पर्धक सुफी मोतीवाला हिच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली आणि विषय आकांक्षाचा निघाला.

बायसेक्शुअल आहे आकांशा…

सुरवातील बोलताना श्रेया थोडी संकोचली आणि तिने सुफीला विचारलं, “जर मी ही गोष्ट सर्वांसमोर मांडली, तर मी वाईट ठरेन का?” तिला धीर देत सुफी म्हणाली, “नाही, तू वाईट ठरणार नाहीस; हा तर खेळाचाच एक नियम आहे.” सुफीकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादानंतर श्रेयाने एक मोठा खुलासा केला; तिने सांगितले की आकांक्षा ‘बायसेक्शुअल’ आहे. हे ऐकून सुफीला देखील मोठा धक्काच बसला.

खेळाच्या नियमांमध्ये अडकली आकांशा, गमावल्या दोन लाईफलाईन…

सुरुवातीला तर, सुफी हिने एवढी मोठी गोष्ट गुपित ठेवण्याचा सल्ला दिलेला. पण श्रेया तिच्या भूमिकेवर ठाम होती. खेळाच्या नियमांचा संदर्भ देत श्रेया सुफीला म्हणाली, “ही बाब आता सर्वांसमोर आली आहे. आकांक्षाने स्वतः हे गुपित मला सांगितलं होतं आणि आम्ही आता ते आता शोमध्ये मी उघड केलं. याचा अर्थ असा की, आकांक्षाने तिच्या दोन ‘लाइफलाईन्स’ वापरल्या आहेत आणि उर्वरित प्रवासासाठी तिच्याकडे आता केवळ एकच लाइफलाइन शिल्लक आहे. सांगायचं झालं तर, या शोचं स्वरूप असं आहे की, जर स्पर्धकांचं वैयक्तिक गुपित उघड झालं, तर त्यांना खेळात मिळालेले फायदे किंवा ‘लाइफलाईन्स’ गमवाव्या लागतात.

गौरव खन्नासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा…

ही पहिली वेळ नाही, जेव्हा आकांशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आधीच्या एपिसोडमध्ये तिने प्रसिद्ध अभिनेता आणि पती गौरव खन्ना याच्यासोबत होणाऱ्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं. आकांशा म्हणालेली, मुलांच्या जन्मावरुन त्यांचे दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. याच कारणामुळे त्यांचं नातं मोडण्याच्या टप्प्यावर आहे. मात्र, श्रेया कालराने केलेल्या या नवीन आरोपाबाबत आकांक्षाचे कुटुंब किंवा शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या खुलाशांनंतर आकांक्षाची पुढील पावलं काय असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार.

Follow Us