AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Song : ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’, तुम्हाला मिळणार नव्या गाण्याची मेजवाणी

आता एक नवं कोरं गाण आपल्या भेटीला येत आहे. अर्थात हे लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. ('London cha Raja ... Italy chi Rani...', you will get a feast of new songs)

New Song : 'लंडनचा राजा... इटलीची राणी...', तुम्हाला मिळणार नव्या गाण्याची मेजवाणी
| Updated on: Mar 31, 2021 | 7:12 PM
Share

मुंबई : आता एक नवं कोरं गाण आपल्या भेटीला येत आहे. अर्थात हे लव्ह साँग (Love Song) रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ हे प्रेमगीत बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. (‘London cha Raja … Italy chi Rani…’, you will get a feast of new songs)

नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती असलेल्या ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

गाण्यातून उलगडणार राजा आणि राणीची गोष्ट

कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे. एका राजा आणि राणीची गोष्ट यात दडली आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून ती हळूहळू उलगडत जाते आणि या गीतासोबत ऐकणाराही समरसून जातो हा ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गीताचा प्लस पॅाइंट आहे. केवळ एक गाणं करण्याच्या भावनेतून नव्हे, तर गाण्याच्या माध्यमातूनही मनात उद्भवणाऱ्या काही तरल भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे गाणं बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांचं म्हणणं आहे.

शीतल अहिरराव दाखवणार  जलवा

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आपापल्या परीनं स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शीतल-अभिजीत यांनी ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्यातही कमाल केली आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांनी आपल्या परीनं एक वेगळाच रंग भरला आहे. त्यामुळं रसिकांनाही हे गाणं पहायला आणि ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये ही या गाण्याची आणखी एक जमेची बाजू आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या

7 Kadam Review : रोनित रॉय-अमित साधचा प्रभावहीन स्पोर्ट्स ड्रामा

Video | होळीच्या माहोलात भांगेची नशा, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘बलम पिचकारी’वर डान्स, पाहा व्हिडीओ

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.