7 Kadam Review : रोनित रॉय-अमित साधचा प्रभावहीन स्पोर्ट्स ड्रामा

मोहित झा (Mohit Jha) दिग्दर्शित या सिरीजमध्ये रोनित रॉय आणि अमित साध यांच्यासह दीक्षा सेठ, रोहिणी बॅनर्जी, शिल्पी रॉय, अशोक सिंग आणि बिदिशा घोष यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

7 Kadam Review : रोनित रॉय-अमित साधचा प्रभावहीन स्पोर्ट्स ड्रामा
7 Kadam
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 6:43 PM

7 Kadam Review :आसनसोल 11 (Asansol 11) आणि कोलकाता बागान (kolkata Bagan) या दोन फुटबॉल संघांमधील फुटबॉल सामना सुरु आहे. सामना संपायला शेवटचे 18 सेकंद शिल्लक असताना रवीला (अमित साध) पेनल्टी शूटआउट करुन गोल करणं आवश्यक आहे. हा गोल करणं जितकं अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे गोल करायचा की नाही याचा निर्णय घेणं. गोल करण्याचा प्रयत्न करायचा की नाही, हा निर्णय रवीच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. हा निर्णय त्याला केवळ सात पावलांमध्ये (7 कदम) घ्यायचा आहे. हा निर्णय रवीसाठी अवघड आहे कारण त्याचे वडील (रोनित रॉय) हे विरोधी संघाचे प्रशिक्षक आहेत. रवीचा गोल त्याचं, त्याच्या वडिलांचं, आसनसोल 11 आणि कोलकाता बागान या दोनही संघांचं भविष्य ठरवणार आहे. पेनल्टी शूटआऊटसाठी तो जेव्हा सात पावलं धावणार आहे, त्या सात पावलांमध्ये फ्लॅशबॅकमध्ये रवीची पूर्ण गोष्ट दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (7 Kadam Review : Ronit Roy and Amit Sadh Failed to make Impact in eros now sports drama)

या वेब सिरीजला 7 Kadam असं नाव का? असा प्रश्न सर्वांना पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे. पेनल्टी शूटआऊट दरम्यान बॉल आणि स्ट्रायकरमधील अंतर हे सात पावलांचं आहे. 7 कदम (Saat Kadam) ही पिता-पुत्राच्या नात्याची गोष्ट आहे. सोबतीला स्पोर्ट्स ड्रामादेखील आहे. या स्पोर्ट्स ड्रामा सिरीजमध्ये अभिनेता रोनित रॉय आणि अमित साध या दोघांनी वडील आणि मुलाची भूमिका साकारली आहे. ज्यांना फुटबॉलची आवड आहे, घरात फुटबॉलविषयी भिन्न विचारधारा आहेत अशा लोकांनी ही सिरीज पाहायला हरकत नाही. या सिरीजमध्ये बंगाली अभिनेत्री रोहिणी बॅनर्जी हिने रवीच्या आईची भूमिका निभावली आहे.

ओरोबिंदो पाल (Ronit Roy) हा माजी फुटबॉलपटू आहे. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे नॅशनल चॅम्पियन होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलंय. त्याचे हे स्वप्न त्याच्या मुलाने रवीने (Amit Sadh) याने पूर्ण करावे, अशी त्याची इच्छा आहे. परंतु याला रवीच्या आईचा (Rohini Banerjee) हिचा त्यास विरोध आहे. फुटबॉलमुळे नवरा कायमचा लंगडा झाला आहे, घरी परिस्थिती अंत्यत बेताची आहे, त्यामुळे ती फुटबॉलचा तिरस्कार करते. तिला असं वाटतं की तिच्या मुलाने चांगली नोकरी करावी, पैसे कमवावे, त्याचं आणि त्याच्या दोन लहान बहिणींची लग्नं लावून द्यावी, अशी तिची इच्छा आहे. परंतु ओरोबिंदो बायकोपासून लपवून मुलाला फुटबॉलचं प्रशिक्षण देतो. आईच्या इच्छा, घरची बेताची आर्थिक परिस्थिती, वडिलांचं स्वप्न, पैशांची आवश्यकता अशा विविध कारणांमुळे रवीला आई-वडिलांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात. वडिलांशी फारकत घ्यावी लागते. अशा परिस्थिती रवी वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो का? नॅशनल चॅम्पियन होतो का? आणि फुटबॉल नॅशनल चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये गोल करतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही वेबसिरीज पाहावी लागेल.

मोहित झा (Mohit Jha) दिग्दर्शित या सिरीजमध्ये रोनित रॉय आणि अमित साध यांच्यासह दीक्षा सेठ, रोहिणी बॅनर्जी, शिल्पी रॉय, अशोक सिंग आणि बिदिशा घोष यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. झा यांनी यापूर्वी ‘हिटलर दीदी’, ‘परवरिश’ आणि ‘कुमकुम एक प्यारा सा बंधन’ यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. परंतु या स्पोर्ट्स ड्रामा सिरीजमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडण्यात मोहित अपयशी ठरतो. सिरीजमधील बहुतांश महत्त्वाचे प्रसंग खूपच प्लेन वाटतात, यातली पात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतात. रवी गोल करणार का? ही एक गोष्ट सोडली तर संपूर्ण सिरीजमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही, जी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. तसेच या स्पोर्ट्स ड्रामा सिरीजचा बहुतांश भाग हा फॅमिली ड्रामाच वाटतो. यात फुटबॉलला फारसं महत्त्व दिग्दर्शकानं दिलेलं नाही. त्यामुळे फुटबॉल प्रेमी ही सिरीज पाहायला सुरुवात करतील, तेव्हा त्यांचा हिरमोड होऊ शकतो.

या सिरीजमधील पात्र हिंगली (हिंदी आणि बंगाली भाषेचे विचित्र मिश्रण) भाषेत बोलताना दिसतात. त्यामुळे अनेकवेळा ही सिरीज पकड घेण्यात अपयशी ठरते. रोनित फार चांगली हिंदी किंवा फार चांगली बंगाली बोलताना कधी दिसलेला नाही. परंतु दिग्दर्शकाने त्याच्यावर हिंगली भाषा लादलीय असं वाटत राहतं. अमित साधदेखील भाषेच्या आणि डायलॉग्जच्या बाबतीत प्रभावहीन वाटतो. सिरीजमध्ये दोन फुटबॉल संघ आहेत. परंतु रवीव्यतिरिक्त कोणत्याही इतर खेळाडूला महत्त्व दिलेलं नाही. दिग्दर्शकाच्या नजरेतून ही सिरीज पाहताना असं वाटतं की, फुटबॉल हा सांघिक खेळ नसून एकट्या खेळाडूचा खेळ आहे. कारण रवी हा या खेळातला वन मॅन आर्मी आहे, असंच दिग्दर्शकाने दाखवलं आहे. या सिरीजमधील कोणताही प्रसंग वास्तववादी वाटत नाही.

या सिरीजमध्ये किरण (दीक्षा सेठ) ही रवीची (अमित साध) प्रेयसी म्हणून दिसते. परंतु त्यांच्यात कुठेही केमिस्ट्री पाहायला मिळत नाही. किरण ज्या प्रकारचं बंगाली या सिरीजमध्ये बोलताना दिसलीय, ते ऐकून कोणत्याही बंगाली प्रेक्षकाला केवळ राग येईल. किरणच्या पात्रासाठी एखाद्या बंगाली अभिनेत्रीला दिग्दर्शकाने संधी द्यायला हवी होती किंवा तिला जबरदस्तीचे बंगाली डायलॉग्ज द्यायला नको होते, असे अनेक बंगाली प्रेक्षक सांगतात. बंगाली लोकांचं फुटबॉलवर उत्कट प्रेम आहे. परंतु ‘7 कदम’मध्ये ती उत्कटता पाहायला मिळत नाही. या मिनी वेब सिरीजमध्ये 20-25 मिनिटांचे चार एपिसोड्स आहेत.

हेही वाचा

Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?

(7 Kadam Review : Ronit Roy and Amit Sadh Failed to make Impact in eros now sports drama)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.