AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तारीख ठरली, कोण होणार नवा अध्यक्ष? सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तारीख ठरली आहे, येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तारीख ठरली, कोण होणार नवा अध्यक्ष? सर्वात मोठी बातमी समोर
ncpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 9:21 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अजित पवार हे विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते, मात्र विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होताच, या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी हात उंचावून सुनेत्रा पवार यांच्या निवडीला समर्थन दिलं. दरम्यान आता केवळ औपचारिकता बाकी असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष  निवडीसाठी पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्रिपदासह त्यांच्याकडे इतरही काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये पक्षाचा गट नेता म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली, तसेच राष्ट्रवादीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देखील त्यांना देण्यात आले. त्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे, येत्या 26 तारखेला यासंदर्भात घोषणा होणार आहे.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल