Video: अरेच्चा! माधुरीने केला बोटॉक्स? चेहरा पाहून चाहते हैराण

'धकधक गर्ल'चा नवा लूक पाहिलात का? व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

Video: अरेच्चा! माधुरीने केला बोटॉक्स? चेहरा पाहून चाहते हैराण
Madhuri Dixit
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 27, 2022 | 5:40 PM

मुंबई- बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) या डान्स शोचं परीक्षण करतेय. या शोमध्ये माधुरीचा एकापेक्षा एक जबरदस्त अंदाज पहायला मिळतोय. या वीकेंडच्या एपिसोडच्या शूटिंगसाठी नुकतीच माधुरी सेटवर पोहोचली होती. यावेळी तिने प्रिंटेड लेहंगा परिधान केला होता. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये या शोचं शूटिंग होत आहे. सेटवर पोहोचण्यासाठी काही पापाराझींनी माधुरीचे फोटो क्लिक केले तर काहींनी व्हिडीओ शूट केला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पहा व्हिडीओ-

माधुरीच्या या लूकची चाहत्यांकडून प्रशंसा होतेय. मात्र काहीजण बोटॉक्स केल्याचा अंदाज वर्तवत आहेत. लिप फिलर आणि बोटॉक्समुळे माधुरीचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा आणि सुजलेला दिसत असल्याचं नेटकरी म्हणतायत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

माधुरी तिच्या हास्यासाठी खास ओळखली जाते. मात्र या व्हिडीओतील तिच्या हास्यालाही काहींनी ‘बनावट’ आणि ‘आर्टिफिशियल’ असं म्हटलंय. माधुरीने खरंच बोटॉक्स केलं का, असा सवाल काही चाहते करत आहेत.

बोटॉक्स म्हणजे बोट्युलिनम टॉक्सिन. डोळ्यांखाली दिसणाऱ्या सुरकुत्या तसंच चेहऱ्यावर दिसणारं वाढलेलं वय लपवण्यासाठी ही ट्रिटमेंट घेतली जाते. आजकाल अनेक अभिनेत्री बोटॉक्स करताना दिसतात. चेहऱ्यावर वाढलेलं वय दिसू नये यासाठी अनेक अभिनेत्री बोटॉक्सचा पर्याय निवडतात.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री नोरा फतेही आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यासोबत माधुरी सध्या ‘झलक दिखला जा 10’ या डान्सिंग शोचं परीक्षण करतेय. माधुरी याआधीही या शोची परीक्षक होती. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा हटके लूक पहायला मिळतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें