AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : श्रीदेवी की जुही चावला ? माधुरी दीक्षितने सांगितली तिची आवडती अभिनेत्री; काय म्हणाली?

माधुरी दीक्षित सध्या केबीसीचं मराठी व्हर्जन, 'कोण होणरा करोडपती' हे होस्ट करत आहे. या शोच्या प्रीमिअरला सोनाली बेंद्रेंने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने माधुरीला एक प्रश्न विचारला, तिला जुही चावला आणि श्रीदेवी, यातलं कोण आवडतं ? माधुरीने काय दिलं उत्तर ?

Madhuri Dixit : श्रीदेवी की जुही चावला ? माधुरी दीक्षितने सांगितली तिची आवडती अभिनेत्री; काय म्हणाली?
| Updated on: Oct 17, 2026 | 9:41 PM
Share

माधुरी दीक्षितने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं, प्रमुख अभिनेत्रींैपीक एक होती ती. तिचा करिश्मा आजही कायम आहे. 90 च्या दशकांत तिने डान्स, अभिनयाच्या जोरावर मोठा पडदा गाजवला. मात्र लग्नानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. असं असल तरी काही काळाने तिने मोठ्या पडद्यावर पुनरगामन केलं, अजूनही ती ॲक्टिव्ह आहे. फिल्म्स, वेब सीरिज यांच्यासोबतच आता रिॲलिटी शो मध्ये देखील दिसते. सध्या माधुरी ही कौन बनेगा करोडपति चं मराठी व्रज्रन, ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) हा शो होस्ट करत आहे.

याचा प्रीमिअर नुकताच पार पडला, य शोला सोमवारपासून सुरूवात झाली. या प्रीमिअरला अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने हजेरी लावली होती, त्यावेळी दोघींनी खूप गप्पा मारल्या. तेव्हा सोनालीने माधुरीला असा एक सावल विचारला, ज्याचं उत्तर कदाचित माधुरीकडे नव्हतं. खरंतर सोनालीने माधुरीला विचारलं की, तिला श्रीदेवी आणि जुही चावला यांच्यापैकी जास्त कोण आवडतं ? त्यावर माधुरीने काय उत्तर दिलं ?

श्रीदेवी आणि जुहीपैकी माधुरीला कोणा आवडतं ?

सोनालीने हा प्रश्न विचारला खरा, पण त्याचं उत्तर देताना माधुरीने कोणत्याही एका अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही, तर तिने दोघींच्याही अभिनयाचं कौतुक केलं. माधुरीने श्रीदेवी आणि जुही चावला या दोघींच्या प्रतिभेचं भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, “ श्रीदेवी यांचं कॉमिक टायमिंग कमाल होतं. तसं तर जुही चावलाचंह कॉमिक टायमिंगही चांगलं आणि तिचं हसणंही खूप सुंदर.. दोघीही अत्यंत प्रतिभावान, त्यामुळे मला त्या दोघीही आवडायच्या” असं माधुरीने नमूद केलं.

श्रीदेवीच्या टॅलेंटचं कौतुक

पुढे बोलताना, माधुरी दीक्षितने श्रीदेवी यांच्या आणखी एका खास गुणाचं कौतुक केलं. श्रीदेवी यांनी अनेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं, याकडे तिने लक्ष वेधलं. “ श्रीदेवी यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा चार वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ही खरंच खूप कमाल गोष्ट होती” असं ती म्हणाली.

सोनाली बेंद्रे म्हणाली..

यानंतर सोनाली बेंद्रेनेही या प्रश्नाचं उत्तर देत आपली आवड सांगितली. ती म्हणाली, “ जेव्हा जुही चावला आणि श्रीदेवी यांची नावं घेतली जातात, तेव्हा त्यांच्यासोबत आणखी कोणाचं नाव घेतलं जातं, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे माझी आवड नेहमीच माधुरी हीच राहिली आहे!” सोनालीचं हे उत्तर ऐकून माधुरी दीक्षित चक्क लाजली.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट