Mahesh Anand : 5 लग्न 12 अफेअर्स, शेवटच्या क्षणी एकाकी आयुष्य, अखेरची इच्छाही अपूर्ण; कुजलेल्या अवस्थेत आढळलेला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह

Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पाच लग्न झालेली. तरीही शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ कोण नव्हतं. अभिनेत्याची शेवटची इच्छाही अपूर्ण राहिलेली.

Mahesh Anand : 5 लग्न 12 अफेअर्स, शेवटच्या क्षणी एकाकी आयुष्य, अखेरची इच्छाही अपूर्ण; कुजलेल्या अवस्थेत आढळलेला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह
| Updated on: Nov 24, 2026 | 5:53 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 80 आणि 90 च्या दशकात खलनायकाच्या भूमिका साकारून लोकप्रिय झालेला असाच एक अभिनेता म्हणजे महेश आनंद. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घाबरवणाऱ्या या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यातील जग मात्र अनेक दुःखांनी भरलेलं होतं. 5 लग्न आणि 12 अफेअरमुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्यावर एकटेपणाची वेळ आली.

300 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

Loading...

महेश आनंदनं आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘शहेनशाह’, ‘कुली नंबर १’, ‘गुमराह’, ‘ठाणेदार’, ‘विश्वात्मा’, ‘अकेला’, ‘स्वर्ग’, ‘लाल बादशाह’, ‘कुरुक्षेत्र’, ‘तूफान’, ‘खुद्दार’ आणि ‘क्रांतीवीर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यानं आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, एकेकाळी चित्रपटसृष्टीत व्यग्र असलेल्या या अभिनेत्याला पुढे काम मिळणं कमी झालं आणि त्याची आर्थिक परिस्थितीही खालावली.

महेश आनंदच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा झाली होती. त्यानं पाच वेळा लग्न केलं. तसेच त्याचे 12 अफेअर होते. अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. नाती टिकवण्यात त्याला यश आलं नाही. महेश आनंदच्या आयुष्यातील शेवटचा काळ अत्यंत कठीण होता. त्याच्याकडे काम नव्हतं, आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ‘माझ्याकडे पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे नाहीत,’ अशा शब्दांत त्यानं आपली परिस्थिती मांडली होती. एवढंच नाही तर सावत्र भावानं आपली सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यानं केला होता. या सगळ्याचा त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. त्याचा मुलगाही त्याच्यापासून दूर गेला होता.

फेब्रुवारी 2019 मध्ये मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरात महेश आनंदचा मृत्यू झाला. त्याच्या घरातील मोलकरणीनं दोन दिवस दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता महेश आनंदचा मृतदेह सोफ्यावर आढळला. तोपर्यंत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. घरात दारूच्या बाटल्या आणि वापरून टाकलेल्या प्लेट्सही पडलेल्या होत्या.

शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

महेश आनंदची पाचवी पत्नी लाना त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रशियाहून आली होती. मात्र, अभिनेत्याची एक इच्छा अखेरपर्यंत अपूर्णच राहिली. त्याला शेवटच्या क्षणी आपल्या मुलाला त्रिशूलला एकदा मिठी मारायची होती. मात्र, अभिनेत्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. आयुष्यभर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला अखेरच्या काळात आपल्या मुलाच्या भेटीची आस लागून राहिली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us