Saiee Manjrekar : पांढरा शर्ट अन्…महेश मांजरेकरांच्या लेकीचा बोल्ड अंदाज, शूटिंगमधला फोटो लीक

Saie Manjrekar : महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरची दाक्षिणात्य सुपरस्टारच्या सिनेमात वर्णी लागली आहे. सेटवरील अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला आहे.

Saiee Manjrekar : पांढरा शर्ट अन्...महेश मांजरेकरांच्या लेकीचा बोल्ड अंदाज, शूटिंगमधला फोटो लीक
| Updated on: Oct 26, 2026 | 8:57 PM

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर लवकरच राम चरणच्या सिनेमात झळकणार आहे. सई मांजरेकरचा सिनेमातील लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्लोबल स्टार राम चरणच्या आगामी पीरियड ड्रामा ‘द इंडिया हाऊस’मधील अभिनेत्री सई मांजरेकरचा लूक एस्टोनियामधून समोर आला आहे, जिथं सध्या टीम शूटिंग करत आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये सई तिच्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

सई मांजरेकरचा फोटो व्हायरल

Loading...

पांढरा पूर्ण बाह्यांचा शर्ट, मरून रंगाचा स्कर्ट, गडद रंगाचे स्टॉकिंग्ज आणि पांढरे शूज परिधान करून, अभिनेत्रीने त्या काळासाठी एक साधा पण प्रभावी लूक केला आहे. तिचे केस मोकळे आहेत, तर तिच्या चेहऱ्यावर तीव्र भावना आणि निश्चय दिसून येतो. डोक्यावर पेटती मशाल धरलेली आणि पाठीमागे आंदोलनाचे बॅनर दिसत आहे.

‘तेलंगणा टूडे‘च्या वृत्तानुसार एका सूत्राने सांगितलं की, ”इंडिया हाऊस’मधील सईची भूमिका प्रेक्षकांनी तिला यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. तिचा लूक त्या काळाशी जोडलेला आहे. सईच्या भूमिकेत एक विशिष्ट तीव्रता आहे, आणि प्रेक्षकांना एक अभिनेत्री म्हणून तिची एक नवीन बाजू पाहायला मिळेल.’

 

दरम्यान, सई मांजरेकरने अभिनेत्रीने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काकस्पर्श’ या मराठी चित्रपटात खुशी दामलेच्या छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग ३’ या हिंदी ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात सलमान खानसोबत तिनं खुशी चौटालाची पहिली मुख्य भूमिका साकारली. २०२० मध्ये, ती आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. २०२२ मध्ये, तिनं वरुण तेज सोबत घनीमधून तेलगू चित्रपटात पदार्पण केलं. पण हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर सई तेलुगू-हिंदी द्विभाषिक संदीप उन्नीकृष्णनचा बायोपिक ‘मेजर’मध्ये दिसली, आहे. या सिनेमात तिनं ईशा अग्रवालची भूमिका केली होती.

त्यानंतर सई ‘कुछ खट्टा हो जाए’ या चित्रपटात गुरू रंधवासोबत दिसली. सई शेवटची प्रदीप चिलकुरीच्या तेलुगु ॲक्शन ड्रामा अर्जुन सन ऑफ वैजयंतीत दिसली होती. या चित्रपटात नंदामुरी कल्याण राम आणि विजयशांती यांच्यासोबत सई मांजरेकर, सोहेल खान, बबलू पृथ्वीराज, श्रीकांत आणि आर. सरथकुमार यांच्या भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us