AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक जग भारी वाटायला लागतं, रात्रीची झोपच उडते, 12 वर्षांनंतरही तरुणाईच्या मनावर राज्य करतं मराठी गाणं

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांचे आवाज, चिनार-महेश यांचं संगीत आणि गुरु ठाकूर यांचे शब्द यामुळे या गाण्याला विशेष ओळख मिळाली. अनेक वर्षांनंतरही हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीचं आहे. या गाण्याला यूट्यूबवर १४ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.

अचानक जग भारी वाटायला लागतं, रात्रीची झोपच उडते, 12 वर्षांनंतरही तरुणाईच्या मनावर राज्य करतं मराठी गाणं
Marathi romantic songImage Credit source: social media
| Updated on: Oct 18, 2026 | 1:01 AM
Share

पहिलं प्रेम म्हणजे एकदम भान हरपून टाकणारी गोष्ट. रात्रंदिवस एकाच व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि जगण्याची स्टाईलच बदलून जाते. २०१४ मध्ये एका सिनेमाने आणि त्यातल्या एका गाण्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला याच प्रेमाच्या दुनियेत नेलं होतं. तशी रोमँटिक गाणी रोजच येतात आणि जातात, पण या गाण्यात असं काय होतं की नाक्या-नाक्यावर फक्त त्याचीच चर्चा होती?

एकदम साधा-रांगडा मुलगा आणि सायकलवरून जाणारी साधी-सुंदर मुलगी… त्यांच्या या निरागस प्रेमकथेने सर्वांनाच भुरळ घातली. पण खरी जादू केली ती त्यातल्या एका गाण्याने! अगदी सोपे शब्द आणि पहिल्या प्रेमाची हुरहुर… हे गाणं ऐकताना प्रत्येकाला वाटायचं की यार, हे तर माझ्याच मनातलं गाणं आहे. गुरु ठाकूर यांचे भिडणारे शब्द आणि चिनार-महेश यांचं संगीत… खरंच एक भन्नाट कॉम्बिनेशन होतं.

या सगळ्या रहस्याचा उलगडा तेव्हा होतो, जेव्हा कानांवर स्वप्नील बांदोडकर आणि खुद्द त्या चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकर यांचा गोड आवाज पडतो. होय, आपण बोलतोय ‘टाइमपास’ चित्रपटातल्या ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या एव्हरग्रीन गाण्याबद्दल. रवी जाधव यांच्या या चित्रपटातल्या दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ताच्या (केतकी) प्रेमकथेचा हा खरा आत्मा होता. कॉलेजचा कट्टा असो किंवा प्रत्येकाची कॉलरट्यून, सगळीकडे हेच गाणं वाजत होतं.

आज एवढी वर्षं उलटून गेली, तरी या गाण्याची जादू जराही कमी झालेली नाही. नव्या पिढीलाही ते तितकंच आपलंसं वाटतं. कारण पहिल्या प्रेमाची ती धाकधूक आणि निरागसता प्रत्येक पिढीला अनुभवायची असते. ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडणाऱ्या त्या पहिल्या प्रेमाची एक कायमस्वरूपी आणि गोड आठवण आहे. या गाण्याला आता सध्या युट्यूबवर १४ मिलियन व्ह्यूज आलेले आहेत.

गाण्याचे बोल

रंगबावऱ्या स्वप्नांनी सांगा रे सांगा

कुंदकळ्यांना वेलींनी सांगा रे सांगा

हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे

का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

नादावला धुंदावला कधी गुंतला जीव बावळा

नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा

हा भास की तुझी आहे नशा

मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला कुणी भेटले माझे मला

खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला

हा भास की तुझी आहे नशा

मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे

मला वेड लागले प्रेमाचे

प्रेमाचे प्रेमाचे

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट