Video : हिरे व्यापाऱ्याला सोडून मलायका पुन्हा त्याच मार्गावर, त्याच्यापासून दूर राहूच शकली नाही
अभिनेत्री मलायका अरोरा आता पुन्हा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. हिरे व्यापारासोबत मलायका रिलेशनशिपमध्ये आहे. अशा चर्चांनी जोर धरलेला असताना, मलायका पुन्हा पूर्वीच्या मार्गावर जाताना दिसली. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आली आहे. मलायका हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री, एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत दिसली. ज्यामुळे मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अनेकांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
पुन्हा एकत्र दिसले मलायका – अर्जुन
सांगायचं झालं तर, मलयाका आणि अर्जुन यांना 2019 मध्ये नात्याची कबुली दिली आणि 2024 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. दोघ्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला असताला, अर्जुन याने ‘मी आता सिंगल आहे…’, असं सर्वांसमोर सांगितलं आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. पण आता व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मलायका कारमध्ये बसल्यानंतर अर्जुन तिच्यासाठी कारचा दरवाजा लावताना दिसला. त्यानंतर दुसऱ्या बाजून कारमध्ये बसताना दिसला.
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फार काही लिहिलेलं नाही. त्यावर फक्त एवढंच लिहिलंय, ‘मलायका अरोरा अँड अर्जुन कपूर स्पॉटेड टुगेदर इन द सिटी.’ पण तरीही सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं असून दोघांच्या पॅचअपचे अंदाज बांधले जात आहेत. अर्थात, त्यांच्या पॅचअपबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सांगायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून, मलायका हिरे व्यापारी हर्ष मेहता याला डेट करत असून, तो मलायका हिच्यापेक्षा 19 वर्ष लहान आहे.
अर्जुन कपूर – मलायका अरोरा
2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांनी 2019 मध्ये सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2024 मध्ये त्यांचं ब्रेकअपचं कळलं. त्याच वर्षी अर्जुनने एका इव्हेंटमध्ये स्वतःला सिंगल असल्याचे सांगत आपल्या नात्याबद्दल स्पष्ट केलं होतं.
ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये कोणतीही कटुता पाहायला मिळाली नव्हती. फेब्रुवारी 2025 मध्येही दोघे एका रिॲलिटी शो दरम्यान एकत्र दिसले होते, त्यावेळी दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर पॅचअपची अपेक्षा व्यक्त केली होती. नुकताच, एंटरटेनमेंट जर्नलिस्ट विकी लालवानी यांनी ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत दोघांचं नातं तुटण्याच कारण सांगितलं होतं. मलायकाला अर्जुनशी लग्न करायचं होतं, तर अर्जुन लग्नासाठी तयार नव्हता, यामुळे दोघांचे ब्रेकअप झालं, असे त्यांनी म्हटले होते.