
चित्रपट सृष्टी बाहेरुन कितीही आकर्षक वाटत असली, तरी आतून पोकळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चित्रपट सृष्टीत मिळणारा पैसा, प्रसिद्धीने डोळे दिपून जातात. चित्रपटाच्या या झगमगत्या दुनियेत आपलं नाव व्हावं, अशी अनेक युवक-युवतींची इच्छा असते. इथे यश मिळवणाऱ्यांपेक्षा अपयशी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्ट्रगल इथे कोणालाही चुकलेला नाही. सर्वात मोठ्या स्टारला सुद्धा खडतर, कठीण काळ पहावा लागतो. दरदिवशी पोटापाण्यासाठी लाखो लोक मुंबईत येतात. यात चित्रपट सृष्टीत नाव कमावण्यासाठी आलेल्यांची संख्याही कमी नसते. दूरच्या गावातून, शहरातून चित्रपटांच विश्व खूप सुंदर भासतं. मोहात पाडतं, पण मुंबईत आल्यानंतर वास्तव लक्षात येतं. चित्रपट सृष्टीच्या ग्लॅमरमागची दुनिया किती दिखावटी, बनावटी आहे ते समजतं. ते चटके आयुष्यभराचे धडे देऊन जातात. लाखोंमध्ये एखादाच स्टार होतो किंवा होते. चित्रपटात करियर करण्यासाठी आलेले अनेक जण कुठे गायब होऊन जातात? हे कळतही नाही. चित्रपटामागची ही जी दुनिया आहे, त्यावर आतापर्यंत अनेक फिल्मस, वेब सीरीज आल्यात. वास्तव माहित असतं, पण, तरी ही या रंगीन, मायावी दुनियेच आकर्षण अजिबात कमी...