AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Joshi : ‘देवदास’च्या सेटवर मनोज जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, 20 दिवस होते कोमात; सांगितला कठीण काळ

Manoj Joshi On Brain Stroke : 'देवदास' सिनेमाच्या सेटवर मनोज जोशी यांना ब्रेन स्ट्रोक आलेला. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Manoj Joshi : 'देवदास'च्या सेटवर मनोज जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, 20 दिवस होते कोमात; सांगितला कठीण काळ
Manoj JoshiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 5:57 PM
Share

मराठी अभिनेते मनोज जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी शाहरुख खानच्या ‘देवदास’ सिनेमात भूमिका साकारलेली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मनोज यांना ब्रेन स्ट्रोक आलेला. त्यावेळी मनोज जोशी २० दिवस कोमामध्ये होते. आता एका मुलाखतीत मनोज यांनी यादरम्यानचा प्रसंग सांगितला आहे.

मनोज जोशी यांनी सांगितला कठीण काळ

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज जोशी यांनी ‘देवदास’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. मनोज जोशी म्हणाले की, ‘मी २००१ मध्ये ‘देवदास’ सिनेमाचं शूटिंग करत होतो. ट्विन टॉवरचा जो हल्ला झाला होता, त्याच्या आठ दिवस आधी मला ब्रेन स्ट्रोक आलेला. सिनेमाच्या सेटवर माझे डोळे सुजायला लागले. पूर्णपणे डोळे बाहेर येतील असं झालेलं. डोकं सूजलेलं आणि चेहरा सुजला होता.’

‘सकाळपासून सेटवर होतो आणि माझा शॉट येण्याची वाट बघत होतो. मला संध्याकाळी ४ च्या सुमारास शूटिंगसाठी बोलावण्यात आलं. मी शाहरुखच्या मोठ्या भावाची भूमिका साकारलेली. तोपर्यंत डोळे सुजले होते, माझे डोळे बाहेर पडतील का काय एवढे ते सुजले होते. दोन दिवसांपासून माझं असं भयंकर डोकं दुखतच होतं.नाईट शिफ्ट असल्यामुळे डोकं दुखतंय की काय, असं मला वाटायचं. माझ्या फॅमिली डॉक्टरांनी मला चार इंजेक्शनं दिली होती. डोकं दुखायला लागलं, तर एक गोळी खाण्यासाठी मला दिली होती. मी त्या दिवशी दर चार तासांनी एक-एक गोळी घेतली होती. एकाच दिवशी दोन-तीन गोळ्या घेऊनही माझं डोकं दुखायचं थांबत नव्हतं.’

‘पहाटे ३.३० – ४ च्या आसपास मी चेकिंगसाठी गेलो. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी माझ्या पत्नीला मला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. हे खूपच धोकादायक आहे आणि माझ्या डोक्यातील दोन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असून त्यात रक्ताच्या गाठी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मी सव्वा महिना लीलावती रुग्णालयात होतो. अडीच वर्षांपूर्वी माझ्या भावाचं अपघाती निधन झालेलं. त्यामुळे माझ्या पत्नीने माझ्या आई-बाबांना याबद्दल सांगितलं नाही. मी २० व्या दिवशी भानावर आलो होतो आणि मी काहीही हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हा माझे बँकेतील पूर्ण पैसे संपले होते. आई वडिलांचा आशीर्वाद आणि बायकोचा पाठिंबा होता. तिनं ट्युशन घेतले आणि पैसे जमा केले.’ असं मनोज यांनी शेवटी सांगितलं.

Follow Us
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?