युद्धामुळे कलाकारांची झोप उडाली! कुणाचा मुलगा तर कुणाची पत्नी… या सेलिब्रेटींचे नातेवाईक युद्धभूमीत अडकले

मद्य पूर्वेत युद्ध सुरू आहे. शेकडो भारतील आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यात सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे.

युद्धामुळे कलाकारांची झोप उडाली! कुणाचा मुलगा तर कुणाची पत्नी... या सेलिब्रेटींचे नातेवाईक युद्धभूमीत अडकले
Lara
Image Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2026 | 9:07 PM

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यु्द्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. इस्रायल-अमेरिका हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणने युएईसह मध्यपूर्वेतील अनेक देशांवर हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता शेकडो भारतील आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यात सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांचा मुलगा युएईमध्ये अडकला आहे. तसेच पंजाबी गायक आणि अभिनेता अम्मी विर्क याची पत्नी आणि मुलगीही दुबईमध्ये अडकली आहे. तसेत अभिनेत्री लारा दत्ता आणि तिची मुलगीही दुबईमध्ये अडकली आहे.

अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा युएईमध्ये अडकला

गायक अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा दुबईमध्ये आहे. अभिजीत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘माझा मुलगा जय भट्टाचार्य सध्या दुबईमध्ये अडकला आहे. एक वडील म्हणून, आमच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ आहे. मी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि शक्य तितक्या लवकर त्याच्या सुरक्षित परतीसाठी मदत करण्याचे आवाहन करतो.’

अ‍ॅमी विर्कची पत्नी आणि मुलगी दुबईमध्ये अडकली

पंजाबी गायक आणि अभिनेता अ‍ॅमी विर्क याची पत्नी आणि 6 वर्षांची मुलगी दुबईमध्ये अडकली आहे. अ‍ॅमी विर्कने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. अ‍ॅमी विर्कने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत म्हटले की, ‘यूएईमधील परिस्थिती माझ्या मनावर खूप ताणतणाव निर्माण करत आहे. माझी पत्नी आणि माझी सहा वर्षांची मुलगी तिथे आहे. एक पती आणि वडील म्हणून, अशा काळात भावना आणि तणाव नियंत्रित करणे अशक्य आहे. “बाबा, जर काही झाले तर मी माझ्या पलंगाखाली लपून राहीन. मी एक खंबीर मुलगी आहे, बाबा, काळजी करू नका.” कोणताही वडील कधीही त्याच्या मुलीकडून असा संदेश ऐकू इच्छित नाही.’

अभिनेत्री लारा दत्ता दुबईमध्ये अडकली

अभिनेत्री लारा दत्ता देखील दुबईमध्ये अडकली आहे. लारा दत्ताने सांगितले की, मी सध्या मुलगी सायरासोबत दुबईमध्ये आगे. लाराने शूटिंग दरम्यान अचानक स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि आकाशात क्षेपणास्त्रे उडताना दिसली असा दावा केला आहे. लाराने एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, “मला सहसा अशा गोष्टी पोस्ट करायला आवडत नाहीत. इस्रायल आणि इराणमधील परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आम्ही दुबईमध्ये आहोत. दुबईच्या एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत होती तेव्हा अचानक वरून मोठ्याने स्फोट झाले. आम्ही सर्वजण घाबरलो आणि आकाशात क्षेपणास्त्रे अडवताना पाहून स्टुडिओबाहेर पळत सुटलो.”

 

Follow Us