AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe: प्रियाच्या आठवणीत शंतनू, लग्नाआधीच्या आठवणी सांगत म्हणाला, ‘तिच्या सारखी कोणीच नाही अन्…’

Priya Marathe: प्रियाच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, तिच्या आठवणीत शंतनू मोघे भावूक, वडिलासोबत नातं आणि लग्नाआधीच्या आठवणीसांगत अभिनेता म्हणाला, 'तिच्या सारखी कोणीच नाही अन्...'

Priya Marathe: प्रियाच्या आठवणीत शंतनू, लग्नाआधीच्या आठवणी सांगत म्हणाला, 'तिच्या सारखी कोणीच नाही अन्...'
प्रिया मराठे - शंतनू मोघे
| Updated on: Oct 03, 2026 | 8:30 AM
Share

Priya Marathe: अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाला वर्ष पूर्ण झालं आहे. 31 ऑगस्ट 2025 मध्ये प्रिया हिने अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी तिची झुंज अपयशी ठरली आणि तिने जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या कठीण काळात पती शंतनू मोघे याने प्रियाला खंबीरपणे साथ दिली. आवडता व्यक्त अर्ध्यातून सोडून गेल्यानंतर फार दुःख होतं आणि त्या व्यक्तीच्या आठवणी फक्त सोबत राहतात. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शंतनू यानेस प्रियासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या… एवढंच नाही तर, वडील श्रीकांत मोघे आणि प्रिया हिच्याबद्दल सांगितलं..

शंतनू आणि प्रिया यांच्या नात्याबद्दल श्रीकांत मोघे यांना कसं कळलं?

मुलं आई – वडिलांपासून काही गोष्टी लपवून ठेवतात, पण आई – वडिलांना सगळं काही माहिती असतं… असंच काही शंतनू याच्यासोबत देखील झालं. शंतनू म्हणाला ‘बाबाला माझ्या सर्व मित्र – मैत्रिणींबद्दल माहिती होतं. एवढंच नाही तर, माझ्या नाटकाचे प्रयोग कुठे सुरु आहेत. हे सुद्धा बाबाला माहिती असायचं… पण जेव्हा प्रिया आणि माझं ठरलं, पण सगळं ठरल्याशिवाय घरी कोणाला सांगत नाही… याच दरम्यान मी पुण्यात गेलेलो आणि बाबाचा मला फोन आला, तो मला म्हणाला ‘अभिनंदन…’, मी म्हणालो, ‘काय झालं, अभिनंदन कशासाठी?’ यावर बाबाने विचारलं, प्रिया मराठे ना…

शंतनू पुढे म्हणाला, ‘पुण्यात राहून बाबाला प्रियाबद्दल कळलं होतं… मी शॉकच झालो. पण तेव्हा बाबा मला असं काही म्हणाला नाही की, बस तुला चार गोष्टी सांगतो… पण बाबा कायम माझ्या पाठिशी होता. आज मी ज्या ताकदीने उभा आहे, ती सर्व बाबाची शिकवण आहे. आयुष्य कसं जगावं हे मला बाबाने शिकवलं… आईचा देखील तितकाच पाठिंबा होता.’

‘हे एकच आयुष्य मला देवाने दिलं आहे आणि ते सोडून जाताना, मी करुन दाखवलं… ही भावना हवी..’, यावेळी शंतनू याने प्रिया हिच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल देखील सांगितलं. ‘लग्नाआधी आम्ही जेवढा वेळ एकत्र घालवला, तो सहभार खूप छान होता. त्यामध्ये पैसा, तू काय करतोस, किती यशस्वी आहेस.. कसा दिसतोस… असं काहीही नव्हतं… दिल से दिल का कनेक्शन … असं आमचं नातं होतं. आमचे विचार, मनं जुळली…’

प्रियाचा मिळवलेला फोननंबर आणि पहिली भेट…

शंतनू म्हणाला, ‘प्रिया तेव्हा हिंदी कॉमेडी सर्कसमध्ये काम करायची. मी तिला ओळखत नव्हतो. पण तिला शोमध्ये पाहिल्यानंतर मला खूर भारी वाटलं होतं. तेव्हा मी शर्वरी लोहकरे हिला फोन केला आणि प्रियाचा नंबर मागितला. तिने नंबर दिला सुद्धा… त्यानंतर मी प्रियाला पहिल्यांदा फोन केला आणि म्हटलं आपण दोन मिनिटं बोलू शकतो का? यावर प्रिया म्हणाली, नाही, मी गाडी चालवत आहे… मी पुढे विचारलं, ‘दोन मिनिटं गाडी बाजूला घेता येईल का?’ तिने घेतली गाडी बाजूला..

‘तेव्हा मी तिला म्हणालो, ‘मॅम मला एवढंच सांगायचं होतं की, मला कॉमेडी सर्कस पाहून खूप भारी वाटलं. हिंदीमध्ये मराठी अभिनेत्री गाजवतेय… ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू,’ नंतर आम्ही शर्वरीच्या घरी भेटलो… आमच्याच बोलणं सुरु झालं… तिचे विचार इतके सुंदर होते ना… कमाल? प्रियासारखी कोणीच नाही… त्यानंतर आमच्याच खूप बॉण्डिंग झालं… पुढे लग्न झालं…’, असं देखील शंतनू म्हणाला.

Follow Us
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्ली भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन