AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे. या आंदोलनात तरुणांसोबत अनेक विरोधी पक्ष नेते, कलाकार देखील सहभागी झाले आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सीजेपीच्या आंदोलना विरोधात पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली...
megha DhadeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 6:47 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आंदोलनाविरोधात शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मराठी अभिनेत्री मेघा धाडेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेची सध्या सर्वत्र चर्चेचा रंगली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर CJP आंदोलनाची तीव्र शब्दात निंदा केली आहे.

Megha Dhade

मेघा धाडे काय म्हणाली?

मेघा धाडेने अनेक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत आंदोलकांवर टीका केली. एका व्हिडीओवर तिने कमेंट केली, “मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे.” या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचे फोटो होते. तिने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भाजपला विरोध करणे म्हणजे देशद्रोही नाही, पण देशद्रोह्यांना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे हा खरा देशद्रोहीपण आहे.” दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने स्पष्ट म्हटले, “माझा पंतप्रधानांना पाठींबा आहे.” आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, असा दावा करणारा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

मेघा धाडे कोण?

मेघा धाडे ही बिग बॉस मराठी सीझन १ ची विजेती आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतेच तिने भारतीय जनता पक्षात औपचारिक प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

Follow Us
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले