AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्त, तू हिजडा आहे…; अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष

Prajakta Hanamghar: कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

प्राजक्त, तू हिजडा आहे...; अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष
Prajakta HanamgharImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 7:46 PM
Share

मराठी मनोरंजनसृष्टीत स्पष्ट भूमिका घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत असताना मराठी मालिका, सिनेमांमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघार ही सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम अभिनेत्रीने या पोस्टच्या माध्यमातून तिला ट्रोल करणाऱ्यांच्या तोंडात चांगलीच चपराग मारली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन स्क्रीनशॉट आहे. एका स्क्रीनशॉटमध्ये प्राजक्ताला ट्रोल करत, ‘Gen z चा नावाखाली, हिजडे, समलिंगी, पाळीव पत्रकार, देशद्रोही अफझल प्रेमी, गंजेडी, वामपंथी डफली गैंग, आणि तुझ्या सारखे पैसे घेऊन गु खाणारे लोक हिच 95% होती तिथे’ असे म्हटले आहे. त्यावर प्राजक्ताने अभिनेता, लेखक पंकज पंचारियाची पोस्ट रिपोस्ट केली आहे. ती पोस्ट काय आहे? पाहा…

प्राजक्ताने शेअर केलेली पोस्ट काय आहे पाहा-

पुरुषी संस्कृतीच्या उदात्तीकरणाचा अतिरेक होतो, तेव्हा काँग्रेस-भाजप करत बसायचे का? खालील पोस्टमध्ये सचिनभाऊ म्हणतात, “प्राजक्त, तू हिजडा आहे.” व्याकरणाच्या चुकांवर बोलणे टाळूया. प्राजक्ताच्या विचारधारेचा आदर असला पाहिजे, पण म्हणून तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे योग्य आहे का? ‘हिजडा’ हा शब्द अरबी ‘हिजराह’ (वेगळ्या वाटेने प्रवास करणारा) शब्दाचा अपभ्रंश आहे. महाभारतात शिखंडी हा जगातला पहिला किन्नर राजा होता. पण सचिनभाऊ वाचत नाहीत! असो, शेवटी आपला भाऊ आहे, त्याला सांभाळणे आपली जबाबदारी आहे. आपल्या रागासाठी, सचिनभाऊ, तुम्ही कोणत्याही लिंगभावात्मक समुदायाला शिवी म्हणून वापरू शकत नाही; कारण सीमा आनंद (सेक्स थेरपिस्ट) म्हणतात की, जगातला प्रत्येक पुरुष हा उभयलिंगी (Bisexual) असू शकतो.

आता भाऊ, तू म्हणाला की, “ही समलिंगी आहे.” अरे सचिनभाऊ, समलिंगी ही शिवी नाही होऊ शकत! ती एक लैंगिक स्थिती (Sex Condition) आहे. कंडिशनला शिवी बनवता येत नाही. तू हुशार नाही म्हणून मी तुला प्रेमाने ‘दगड’ किंवा ‘सुकलेला गु’ म्हटले असते, पण तुला राग आला म्हणून मी तुला समलिंगी कसे म्हणू? अजंठा-वेरूळच्या लेण्यांमध्ये तुला समलिंगी शिल्पेही दिसतील. जरा अभ्यास केला की किती मस्त बोलता येते!

L – Lesbian (लेस्बियन)

G – Gay (समलिंगी पुरुष)

B – Bisexual (उभयलिंगी)

T – Transgender (ट्रान्सजेंडर)

Q – Queer (वेगळे – समुदायाने त्याला सन्मानाचा दर्जा दिला.)

A – Asexuality (लैंगिक भावना नसणे – हा आजार नाही, नैसर्गिक भावना आहे.)

I – Intersex (लिंग अस्पष्ट असणाऱ्या व्यक्ती.)

मला शाळेत सेक्स एज्युकेशन शिकवले नाही, पण जगात खूप अभ्यास करता येऊ शकतो. प्राजक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण विचारांच्या खिडकीतून आमचे विचार वेगळे आहेत. म्हणून तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस.

समलिंगी असणे हा गुन्हा नाही. विरुद्ध लिंगी असणे ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. जर विरुद्ध लिंगी लोकच महान असते, तर बाबा बंगालीकडे गुपचुप जाऊन लिंग ताठरण्याच्या गोळ्या लोक कशाला घ्यायला गेले असते?

सचिनभाऊंसारख्या लोकांमुळे लॉकडाऊनमध्ये ९ समलिंगी लोकांनी स्वत:चे जीवन संपवले मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. सारंग पुणेकर (भारतातली पहिली ट्रान्सजेंडर् जिने पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले) सारखी मैत्रीण सुद्धा गेलेली मी पाहिली आहे. मित्रा, असे नका वागू! अक्कल असेल तर समानतेने जगा आणि जगू द्या. टीप :- मला कोणत्याच राजकीय विचारांशी देणेघेणे नाही. लैंगिक समानता असावी, इतकीच साधी अपेक्षा आहे.

प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिली आहे. तसेच तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...