Sonalee Kulkarni: फक्त पैसेवाला मुलगा पाहून…, नवऱ्याच्या पैशांवर सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

Sonalee Kulkarni: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. तर नवऱ्याच्या पैशांबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली

Sonalee Kulkarni: फक्त पैसेवाला मुलगा पाहून..., नवऱ्याच्या पैशांवर सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य
Sonalee Kulkarni
| Updated on: Nov 01, 2026 | 8:56 AM

Sonalee Kulkarni: मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)  कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोनाली हिने 7 मे, 2021 रोजी कुणाल बेनोडेकरशी (Kunal Benodekar) लग्नगाठ बांधली.  दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सोनाली मुलाखतींच्या माध्यमातून कायम खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगत असते, एका मुलाखतीत सोनाली हिने स्वतःच्या आणि नवऱ्याच्या कमाईबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे..

मुलाखतीत सोनाली हिने स्पष्ट केली, तिची कमाई नवऱ्यापेक्षा अधिक आहे आणि याबद्दल दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे. मुलाखतीत दोघांच्या कमाईबद्दल सांगताना सोनाली स्पष्ट म्हणाली, ‘बऱ्याशच्या लोकांच्या अशा कमेंट येतात की, हिचा नवरा खूप कमवत असेल, म्हणूनच तर लग्न केलं. मुलीतर पैसेवाल्याशीच लग्न करतात. पण मला याचा अभिमान आहे की, मी माझ्या नवऱ्याबद्दल जास्त कमवते…’

Loading...

नवऱ्याच्या कमाईबद्दल सोनाली म्हणते, ‘मी त्याचे पैसे आजपर्यंत पाहिलेलेच नाहीत. तो किती कमवतो मला माहितीच नाही. पण आमच्यामध्ये अशी चर्चा झाली आहे की, मी त्याच्यापेक्षा जास्त पैस कमवते. यामध्ये त्याला काही वावगं वाटत नाही, त्याच्या मनात कोणतीच असुरक्षितता वाटत नाही. याचं मला देखली काही वेगळं वाटत नाही…’

 

 

पुढे सोनाली म्हणली, ‘आयुष्यात अशी एक वेळ येणार आहे, जेव्हा मी ठरवेल की, मला काम करायचं नाही, किंवा मी काम नाही करत आहे, तेव्हा तोच कमवणार आहे. मला असं वाटतं, दोघांनी स्वतःचे आकाउंट सेपरेट ठेवायला हवेत. माझे अकाउंट वेगळी आहेत, त्याची बिलं वेगळी आहेत. त्याने मला आजपर्यंत कधीच विचारलं नाही की, तू जे पैसे कमवत आहेस, ते तुझे पैसे कुठे जातात. माझे अकाउंड्स आजही माझे बाबा पाहतात…’, असं स्पष्टच सोनाली हिने सांगितलं.

सोनाली हिचा नवरा कुणाल याच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोनाली आणि कुणाल यांचं लग्न कोरोना महामारी दरम्यान महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार पार पडल. लंडनध्ये मोठ्या थाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सोनालीचा पती कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईला राहतो. कुणालचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात. त्याचं शिक्षणसुद्धा लंडनमध्येच पूर्ण झालं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us