AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Sharmila Thakeray Love Letters: राज ठाकरे – शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा, लग्नात काय घडलेलं?

Raj Sharmila Thakeray Love Letters: राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीबद्दल अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी खास किस्सा सांगितला आहे. त्यांचे लव्हलेटर पोहोचवण्याचं कम वंदना गुप्ते करायच्या. एवढंच नाही तर, त्यांच्या लग्नाबद्दल देखील गुप्ते यांनी सांगितलं आहे.

Raj Sharmila Thakeray Love Letters: राज ठाकरे - शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा, लग्नात काय घडलेलं?
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे
| Updated on: Aug 31, 2026 | 9:37 AM
Share

Raj Sharmila Thakeray Love Letters: राजकारणातील आक्रमक, प्रभावी व तडफदार नेतृत्व म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. राजकारणातील त्यांची मोलाची कामगिरी आज प्रत्येकाला माहिती आहे. पण राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कोणाला माहिती आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीचा आणि लग्नाचा खास किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर पोहोचवण्याचं काम मी करायचे… असं वंदना गुप्ते म्हणाल्या.

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लव्हलेटर्स

जुन्या आठवणी ताज्या करत शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘शर्मिला आणि मी आम्ही दोघींनी मिळून फार धम्माल केली आहे. राज आणि शर्मिला यांना मी फार जवळून पाहिलं आहे. मी दोघांची एकमेकांना प्रेम पत्र पोहोचवली आहेत. ती आमची मैत्री आजपर्यंत टिकून आहे… राज यांना (राज ठाकरे) देखील सर्व गोष्टी माहिती आहे. आता देखील आम्ही शिवाजी पार्क येथे शेजारी राहतो… त्यामुळे सतत भेट होते.’ असं वंगना गुप्ते म्हणाल्या.

राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाबद्दल वंदना गुप्ते म्हणाल्या, ‘राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे याच्या लग्नात देखील आम्ही खूप धम्माल केली. राजचा एक मित्र आणि मी मिळून ठेवणे… वेगवेगळ्या ठिकाणी घड्याळ गजर लावून ठेवले. खूप खूप सतावलं होतं. आजही आमचे संबंध चांगले आहेत…’ असं देखील वंदना गुप्ते म्हणाल्या.

वंदना गुप्ते यांच्याबद्दल सांगयचं झालं  तर, त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आंधळी कोशिंबीर, टाईम प्लीज, दिवसेंदिवस, पछाडलेला, बाप रे बाप डोक्याला ताप, बे दुणे साडेचार, मणी मंगळसूत्र, मातीच्या चुली यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये  महत्त्वाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. दिलखुलास अभिनेत्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट