AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Timepass 3: ‘साई तुझं लेकरू’, ‘टाइमपास ३’मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच प्रेक्षकांनी 'टाइमपास' चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये पाहिलं आहे. दगडूचं हेच साईप्रेम 'टाइमपास 3'मध्येही पाहायला मिळणार आहे.

Timepass 3: 'साई तुझं लेकरू', 'टाइमपास ३'मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'टाइमपास ३'मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीलाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 4:13 PM
Share

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू (Prathamesh Parab) साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच प्रेक्षकांनी ‘टाइमपास’ चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये पाहिलं आहे. दगडूचं हेच साईप्रेम ‘टाइमपास 3’मध्येही (Timepass 3) पाहायला मिळणार आहे. ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून साईच्या चरणी दगडूचं कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम (Bhau Kadam) म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचं सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहू दे, असंही ते सांगत आहेत.

हे गाणं भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आलं असून या गाण्याला अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज यांनीच संगीतबद्धही केले आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांचं नृत्यदिग्दर्शन आहे.

पहा व्हिडीओ-

यापूर्वीही पहिल्या आणि दुसऱ्या भागातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. ‘टाइमपास ३’मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास 3’चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली ‘पालवी’ पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. ‘टाइमपास 3’ हा चित्रपट येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

2014 मध्ये ‘टाईमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?