AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघर्षा बिगर काही खरं नसतं… ‘आम्ही जरांगे’ सिनेमा ट्रेलर पाहिलात का?

Manoj Jarange Patil Movie Amhi Jarange Trailer : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर सध्या सिनेमा येतोय. या सिनेमाचा ट्रेलर सध्या रिलीज झाला आहे. या सिनेमाबाबतची महत्वाची माहिती... सिनेमाचा ट्रेलर, कलाकारांबाबतची माहिती, वाचा सविस्तर...

संघर्षा बिगर काही खरं नसतं... 'आम्ही जरांगे' सिनेमा ट्रेलर पाहिलात का?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 08, 2024 | 7:37 PM
Share

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर नवा सिनेमा येतोय. ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा सिनेमा 14 जून 2024 पासून सिनेमाघरात प्रदर्शित होणार आहे. ‘संघर्ष बिगर काही खरं नसतं’ हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आज रिलीझ झालाय. त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे.

सिनेमा कधी रिलीज होणार?

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्या नंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल ह्यात काही शंका नाही. ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ 14 जूनला आपल्या जवळच्या सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.

कलाकार कोण असणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित ‘आम्ही जरांगे’ हा सिनेमा लवकरच म्हणजेच 14 जून 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.