Swwapnil Joshi | ‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी देणार मोठे सरप्राईज, चाहत्यांनाही लागलीय उत्सुकता!

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी तसेच, मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi ) याने ‘लेटफ्लिक्स मराठी’ सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:00 AM, 16 Apr 2021
Swwapnil Joshi | ‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी देणार मोठे सरप्राईज, चाहत्यांनाही लागलीय उत्सुकता!
स्वप्नील जोशी

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने हिंदी तसेच, मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi ) याने ‘लेटफ्लिक्स मराठी’ सोबतच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. निर्माता-उद्योजक नरेंद्र फिरोदिया व इंडिया नेटवर्कचे संस्थापक राहूल नार्वेकर या दोघांनी मिळून ‘लेटफ्लिक्स’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. ‘लेट्सफ्लिक्स मराठी’ मुळे नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे (Swwapnil Joshi announces his surprise project with lateflix Marathi).

लेट्सफ्लिक्स गुजराती, भोजपुरी, बांगलासह इतर 12 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम, वेब सीरिज, शॉर्टफ्लिम्स, डॉक्युमेंट्रीज व ओरिजनल मराठी सिनेमांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘लेट्सफ्लिक्स’च्या घोषणेपासूनच मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.

गुढीपाडव्याला दिले संकेत!

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नील जोशीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘लेटफ्लिक्स’ सोबतच्या त्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. हा उपक्रम काय असेल, कशाशी निगडित असेल हे मात्र त्याने गुलदस्त्यातच ठेवले. त्याच्या या व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वप्नीलच्या या व्हिडीओमध्ये त्याची लेक मायरा देखील दिसत आहे. त्यामुळे स्वप्नील जोशीचा हा नवा उपक्रम चित्रपट असेल का? किंवा एकदा कार्यक्रम किंवा वेब सीरीज? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या 1 मेला मिळणार आहेत (Swwapnil Joshi announces his surprise project with lateflix Marathi).

स्वप्नील सोबत चिमुकली मायरा देखील दिसल्याने या नव्या सरप्राईजमध्येही देखील तिचा सहभाग असेल का, असा प्रश्न स्वप्नीलच्या चाहत्यांना पडला आहे.

पाहा स्वप्नीलचा व्हिडीओ :

‘बळी’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

राठी मनोरंजन विश्वात सध्या नवनवीन प्रयोग सुरु आहेत. असाच एक नवीन प्रयोग आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. नेहमीच प्रेमाची परिभाषा सांगणारा मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता स्वप्निल जोशी रसिकांना भीतीचा धक्का देणार आहे. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसीरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

(Swwapnil Joshi announces his surprise project with lateflix Marathi)

हेही वाचा :

‘आजी’ शर्मिला टागोरने अद्यापही नाही पाहिला ‘छोट्या नवाबा’चा चेहरा, करीना कपूरने सांगितले कारण…

Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधतीसमोर आता आणखी एक संकट