AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही त्यांच्या घरात…. प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सोसायटीत आढळले चक्क दोन अजगर; Video पाहून हादराल

मुंबईत पावसाळ्यात सापांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या बोरिवलीतील कृष्णनगर परिसरात दोन अजगर आढळले. अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

आम्ही त्यांच्या घरात.... प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या सोसायटीत आढळले चक्क दोन अजगर; Video पाहून हादराल
| Updated on: Sep 18, 2025 | 12:30 AM
Share

सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी साप आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कधी हेल्मेटमध्ये, कधी गाडीच्या डिक्कीमध्ये, तर कधी अक्षरश: शूजमध्ये साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये सापांबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्यातच आता प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते राहत असलेल्या परिसरात दोनदा अजगर आढळल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल स्वत: अवधूत गुप्तेने पोस्ट करत माहिती दिली आहे.

अवधूत गुप्ते हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अवधूत गुप्तने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तो राहत असलेल्या परिसरात साप आढळल्याचे पाहायला मिळत आहे. त्या सापाचे सर्पमित्रांनी कशाप्रकारे रेस्क्यू केले, याचा एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे.

अवधूत गुप्ते पोस्टमध्ये काय म्हणाला?

मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्य गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला, की कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे ह्याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते. त्यामुळे ह्या दोन अजगरांना देखील सर्पप्रेमींच्या मदतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले. ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्ण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर!! जय बोरिवली पूर्व!!, असे अवधूत गुप्तेने म्हटले आहे.

त्याच्या या पोस्टवर असंख्य लोकांनी कमेंट केल्या आहेत. काय फोटो काढलाय, जबरदस्त आणि त्या अजगराचे एक्सप्रेशन लाईक तुम्ही आमच्या जागा खाल्या मग आम्ही तुम्हाला खाणारचं ना? असे एकाने म्हटले आहे. तर काहींनी तुम्ही सांभाळून राहा, काळजी घ्या असा सल्ला त्याच्या चाहत्यांनी दिला आहे.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात