AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई धुणी – भांडी करायची आणि आम्ही…, हलाखीत गेलं निळू फुले यांचं आयुष्य, स्वतःच म्हणालेले…

Nilu Phule: हलाखीत गेलं निळू फुले यांचं आयुष्य, आयुष्यातील 'त्या' दिवसांबद्दल निळू फुले म्हणालेले, 'आई धुणी - भांडी करायची आणि आम्ही...', आज निळू फुले कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

आई धुणी - भांडी करायची आणि आम्ही..., हलाखीत गेलं निळू फुले यांचं आयुष्य, स्वतःच म्हणालेले...
फाईल फोटो
| Updated on: Oct 08, 2025 | 12:34 PM
Share

Nilu Phule: ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘हमाल दे धमाल’, ‘एक होता विदूषक’ अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांच्या भूमिका आणि त्यांचे डायलॉग चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अनेक सिनेमांमध्ये निळू फुले यांनी खलनायकाची भूमिका साकारली, पण त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

निळू फुले आज अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत, पण त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. निळू फुले यांनी आयुष्यात मोठा खस्ता खाल्ला… लहानपणी त्यांनी हलाखीचे दिवस पाहिले. स्वतःच्या परिस्थितीबद्दल खुद्द निळू फुले यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.

रुपेरी पडद्यावर निळू फुले यांचा रुबाब दिसत असला तरी, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जिथे त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. मुलाखतीत निळू फुले यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘आमच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. ‘

‘आमच्या लहानपणी मंडईमध्ये आमची दोन – चार दुकानं होती. पण काही काळानंतर ती देखील राहिली नाहीत. घरात बसलेल्या प्रत्येकाला नोकरी करावी लागत होती.’ यापुढे निळू फुले यांनी भावूक गोष्ट सांगितली, ‘माझी आई तर, चक्क मोलकरणीचं काम करायची…’

‘पुण्यामध्ये एक मशिनच्या वसतिगृहात तिने धुण्या – भांड्याचं आणि स्वयंपाकिणीचं काम केलं होतं… आम्ही दारिद्र खूप जवळून पाहिलं आहे..’ असं देखील निळू फुले म्हणाले होते. निळू फुले यांच्या आजही अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यांची मुलीचं देखील मराठी सिनेविश्वातील मोठं नाव आहे.  निळू फुले यांचं निधन 13 जुलै 2009 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी झालं.

निळू फुले यांचे गाजलेले सिनेमे

दरम्यान, निळू फुले यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’, ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘गाव तसा चांगला पण वेशीला टांगला’, ‘माझा पती करोडपती’, ‘आई’, ‘हमाल दे धमाल’, ‘सोंगाड्या’, ‘भुजंग’, ‘फटाकडी’, ‘कशाला उद्याची बात’, ‘मोसंबी नारंगी’, ‘भिंगरी’, ‘शापित’, ‘पटली रे पटली’, ‘थापाड्या’, ‘कडकलक्ष्मी’, ‘एक होता विदूषक’, ‘धरपकड’ यांसारख्या अनेक गाजलेल्या  सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...