‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीचं युवराज सिंह पासून बड्या सेलिब्रिटींसोबत अफेअर, पण आजही अविवाहित, जगतेय असं आयुष्य
एक काळ असा होता जेव्हा 'मोहब्बतें' सिनेमाने तरुणांच्या मनावर राज्य केलं होतं. सिनेमातील प्रत्येक कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या देखील कायम चर्चा रंगलेल्या असातात. आता सिनेमातील अशा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिने युवराज सिंह पासून बड्या सेलिब्रिटींना डेट केलं, पण आजही अविवाहित आहे.

महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय स्टारर ‘मोहब्बतें’ सिनेमाने एक काळ गाजवलेला. सिनेमातील काही गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. सिनेमातील काही कलाकार आता झगमगत्या विश्वापासून दूर असले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील सिनेमा महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री किम शर्मा हिची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या आता मुलाखतीत किम हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
किम हिच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, तिने भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह पासून बड्या सेलिब्रिटींना डेट केलं, पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. युवराज याच्यानंतर अभिनेत्री नाव लिएंडर पेस, कार्लोस मैरिन, अली पुंजानी, हर्षवर्धन राणे आणि अर्जुन खन्ना यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण कोणासोबतच तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत किम म्हणते, मला असं लाटतं प्रेमात पडणं काही चुकीचं नाही. पण कोणत्याच अटींशिवाय तुम्हाला प्रेमाचा स्वीकार करावा लागेल… मी असं म्हणत प्रेमाला महत्त्व द्यायचं आणि बाकी सर्व गोष्टी लांब ठेवायच्या. प्रेम एक चांगला अनुभव आहे आणि हाच अनुभव पुन्हा घेण्यास काय हरकत आहे?’
पुढे किम असं देखील म्हणाली की, ‘प्रेम काय फक्त चांगल्या व्यक्तीवरच होत नाही. वाईट व्यक्तीवर देखील प्रेम होतं. दे आयुष्य आहे. येथे सर्व गोष्टी यश घेऊन येतील असं होणार नाही. आपण प्रेमावर खूप दबाव टाकतो की, सर्वकाही चांगलं झालंच पाहिजे.’
अभिनेत्रीच्या मते, जर आपण हा ताण थोडा कमी केला, तर प्रेमही आयुष्यातील इतर गोष्टींसारखेच होऊन जातं. तिच्या मते, आनंद आणि समाधानाच्या बाबतीत ते सर्वात वर असतं. किम हिला पुढे काय होईल हे माहीत नसणं भीतीदायक वाटत नाही, तर रोमांचक वाटतं. यामुळे त्यांना जुन्या गोष्टी पुन्हा करण्याऐवजी काहीतरी पूर्णपणे नवीन करण्याची संधी मिळते. सध्या सर्वत्र किम हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
