Mohammed Rafi : सुप्रसिद्ध मराठी गायिकेच्या लग्नात मोहम्मद रफींनी म्हटलेल्या मंगलाष्टका; दोघांमध्ये होतं खास नातं

Mohammed Rafi : मोहम्मद रफींनी सुप्रसिद्ध गायिकेच्या लग्नात मंगलाष्टका म्हटलेल्या. काय होता किस्सा, वाचा सविस्तर.

Mohammed Rafi : सुप्रसिद्ध मराठी गायिकेच्या लग्नात मोहम्मद रफींनी म्हटलेल्या मंगलाष्टका; दोघांमध्ये होतं खास नातं
| Updated on: Nov 26, 2026 | 3:00 PM

हिंदी आणि मराठी संगीतविश्वात आपल्या सुरेल आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक मोहम्मद रफी यांचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. आपल्या आवाजानं असंख्य अजरामर गाणी देणाऱ्या मोहम्मद रफी यांचा मराठी संगीतविश्वाशीही जिव्हाळ्याचं होतं. मात्र, एकदा त्यांनी चक्क मराठी संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या लग्नात मंगलाष्टकं गायली होती. या मंगलाष्टकांसाठी त्यांनी आधीपासूनच खास तयारी केली होती. काय आहे हा रंजक किस्सा जाणून घेऊया.

संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर मराठी संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केलं. ‘एक धागा सुखाचा’, ‘आमचा राजू का रुसला’ आणि ‘खेड्यामधले घर कौलारू’ यांसारख्या अनेक अजरामर गाण्यांची त्यांनी निर्मिती केली. बाबूजींच्या पत्नी ललिता देऊळकर यादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका होत्या. 1938 मध्ये ‘वचन’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं.

Loading...

1947 मध्ये संगीतकार सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘साजन’ या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि ललिता देऊळकर यांनी एकत्र गाणं गायलं होतं. त्या काळात रफी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करत होते, तर ललिता देऊळकर या आधीपासूनच लोकप्रिय गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत गाताना मोहम्मद रफी यांच्यावर काहीसं दडपण आलं होतं.

गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान रफी यांना सूर पकडताना अडचण येत होती. त्यावेळी ललिता देऊळकर यांनी त्यांना धीर दिला आणि आत्मविश्वासानं गाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या सहकार्यामुळे मोहम्मद रफी यांचं दडपण कमी झालं आणि त्यांनी उत्तम प्रकारे गाणं पूर्ण केलं. या प्रसंगानंतर रफी आणि ललिता यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली.

सुधीर फडके यांच्या लग्नात रफींनी गायली मंगलाष्टकं

ललिता देऊळकर यांनी कठीण प्रसंगी दिलेल्या साथीची आठवण मोहम्मद रफी यांच्या मनात कायम होती. त्यामुळे 29 मे 1949 रोजी पुण्यात सुधीर फडके आणि ललिता देऊळकर यांचा विवाहसोहळा पार पडला, तेव्हा रफी यांनी उपस्थिती लावली. इतकंच नाही, तर या लग्नात त्यांनी स्वतः मंगलाष्टकं गायली. मराठमोळ्या विवाहसोहळ्यात मंगलाष्टकं गाण्यासाठी रफी यांनी आधीपासूनच सराव केला होता. त्यांनी पारंपरिक चालीत मंगलाष्टकं सादर केली. एका हिंदी गायकानं मराठी विवाहसोहळ्यात अशा प्रकारे मंगलाष्टकं गाणं ही त्या काळातील विशेष आठवण ठरली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us