AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrs Chatterjee Vs Norway: ‘हॅप्पी बर्थ डे राणी मुखर्जी’, वाढदिवशी राणीकडून चाहत्यांना खास भेट

आज राणी मुखर्जी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं राणीने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. (Mrs Chatterjee Vs Norway: 'Happy Birthday Rani Mukherjee', Special Birthday Gift From Rani)

Mrs Chatterjee Vs Norway: 'हॅप्पी बर्थ डे राणी मुखर्जी', वाढदिवशी राणीकडून चाहत्यांना खास भेट
| Updated on: Mar 21, 2021 | 12:55 PM
Share

मुंबई : आज राणी मुखर्जी आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं राणीने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. तिने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) असं राणीच्या चित्रपटाचं नाव आहे. (Mrs Chatterjee Vs Norway: ‘Happy Birthday Rani Mukherjee’, Special Birthday Gift From Rani)

वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिलं गिफ्ट

आशिमा छिब्बर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि Emmay Ent  करणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसं कर, चाहत्यांना आशा होती की राणी वाढदिवसाच्या निमित्तानं मर्दानी 3 ची घोषणा करू शकते. खरं तर, काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आपल्या वाढदिवसाला राणी मर्दानी 3 ची मोठी घोषणा करू शकते. यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. चाहत्यांना राणीचा मर्दानी आणि मर्दानी 2 हे चित्रपट खूप आवडले होते. चित्रपटात राणीच्या अभिनयाने प्रेक्षक तसेच समीक्षकांची मने जिंकली होती.

बंटी और बबली 2 या चित्रपटात राणीची खास भूमिका

या व्यतिरिक्त राणी मुखर्जी बंटी और बबली 2 या चित्रपटात झळकणार आहेत. सैफ अली खान यावेळीसुद्धा त्याच्या धमाका करणार आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी बर्‍याच दिवसानंतर पुन्हा पडद्यावर दिसतील. या चित्रपटात राणी आणि सैफ व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी देखील मुख्य भूमिकेत आहेत. बंटी और बबली 2 बद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्चला रिलीज होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरविषयी मोठी माहिती समोर आली होती. बातमीनुसार यशराज फिल्म्सने या चित्रपटासाठी बरेच नियोजन केलं असल्याचं समोर आलं होतं. या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्चला रिलीज होऊ शकतो आणि यासाठी यश राजने सलमान खानची निवड केली आहे.

सलमान खानच्या हस्ते होणार चित्रपटाचा ट्रेलर लाईव्ह लाँच ?

असं म्हटलं जात आहे की यश राजच्या टीमनं सलमान खानच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाईव्ह लाँच करण्याची योजना आखली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. जर तसं झालं तर चाहत्यांसाठी एक चांगली बातमी असेल. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

संबंधित बातम्या

Chehre Vs The Big Bull : पहिल्यांदाच बाप-लेक आमने-सामने, कोण मारणार बाजी अमिताभ बच्चन की अभिषेक?

John Abraham : जॉन अब्राहम ओटीटीपासून दूर का?, स्वत: केला मोठा खुलासा, वाचा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.