John Abraham : जॉन अब्राहम ओटीटीपासून दूर का?, स्वत: केला मोठा खुलासा, वाचा

कोरोना काळात, अनेक मोठ्या कलाकारांनी ओटीटीवर जोरदार एंट्री केली. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, वरुण धवन होते मात्र या दरम्यान जॉन अब्राहमचा कोणताही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला नाही. (Why is John Abraham away from OTT ?, a big revelation made by himself, read)

John Abraham : जॉन अब्राहम ओटीटीपासून दूर का?, स्वत: केला मोठा खुलासा, वाचा
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:08 AM

मुंबई : गेल्या एक वर्षात कोरोनानं बॉलिवूडची (Bollywood) कंबर मोडली. मात्र आता हळूहळू काही गोष्टी सुरू झाल्या आहेत. कोरोना काळात, अनेक मोठ्या कलाकारांनी ओटीटीवर जोरदार एंट्री केली. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, वरुण धवन होते मात्र या दरम्यान जॉन अब्राहमचा कोणताही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला नाही. त्यानं आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. जॉनचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जॉननं माध्यमांशी बर्‍याच गोष्टी शेअर केल्या.

वाचा काय म्हणाला जॉन…

यावेळी जॉननं चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणं, ओटीटी प्लॅटफॉर्म, कोविडमध्ये शूटिंग करणं अशा अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. जॉननं त्याचे 3 मोठे चित्रपट ‘मुंबई सागा’, ‘सत्यमेव जयते 2’ आणि ‘अटॅक’ ओटीटीवर प्रदर्शित केले असते, मात्र त्यानं तसे केले नाही. जॉनने याचे कारण सांगितले आहे. अभिनेता म्हणतो, “त्या लोकांना (ज्यांनी आपले चित्रपट ओटीटीवर रिलीज केले) त्यांना कदाचित त्यांच्या चित्रपटाबद्दल विश्वास नव्हता. ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकल्यास ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेले चित्रपट हे सर्व वाईट चित्रपट होते. मला इतका आत्मविश्वास आहे की माझा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी आहे. मुंबई सागा मध्ये हिरोमिसम आहे, त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येईल हे मला ठाऊक होतं. मात्र परिणाम काहीही असू शकतो. कदाचित आम्हाला नुकसान सहन करावं लागणार किंवा लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी येऊ शकतात परंतु मला भीती वाटत नाही. चित्रपटानं एक कोटी किंवा शंभर कोटी कमावले, मला काही फरक पडत नाही.

मोठ्या पडद्यावरच चित्रपट प्रदर्शित करणार

पुढे तो म्हणाला, ‘माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे की हा चित्रपट एका मोठ्या स्क्रीनवर लागणारा चित्रपट होता, हा ओटीटी चित्रपट नव्हता. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही हा चित्रपट केवळ मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करू. त्याचप्रमाणे सत्यमेव जयते 2, अटॅक, एक व्हिलन रिटर्न्स सारखे सर्व चित्रपट भाग्यवान मोठ्या पडद्यावरील चित्रपट आहेत, म्हणून मी मोठ्या पडद्यावर यावे अशी माझी इच्छा आहे. ‘

‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाचं चित्रिकरण सुरू

जॉनचे उत्तर पूर्णपणे भिन्न आणि अचूक आहे. जॉन सुरुवातीपासूनच आपल्या कामाबद्दल सतर्क राहतो. ज्यामुळे तो फक्त त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि कोणत्याही वादात अडकणं टाळतो. तो सध्या त्याच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे. या चित्रपटात दिशा पाटणी मुख्य भूमिकेत झळकणार आहोत. इतकंच नाही तर जॉन शाहरुख खानसोबत लवकरच त्याच्या ‘पठाण’ चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात जॉन व्हिलनची भूमिका साकारताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Marathi Awards : ‘आपलं कुटुंब, आपला सोहळा’ , रेड कार्पेटवर दिसला कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

Web Series : ‘गुडबॉय’ला प्रेक्षकांची पसंती, मिळतोय भरभरुन प्रतिसाद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.