
बॉलिवूडपासून ते साऊथच्या चित्रपटांमध्ये गाजलेली, नामवंत अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बरीच चर्चेत असते. ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दल, लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. कुशाल टंडन, गायक बादशाह तसेच सिद्धांत चतुर्वेदी यांसारख्य अनेक कलाकारांसोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र त्यावर तिने कोणतीही अधकृत कमेंट केलेली नाही. अनेक कलाकारांसोबत नाव जोडलं गेल्यानंतरही 32 वर्षीय ही अभिनेत्री अद्याप सिंगल आहे, तिने लग्न केलेलं नाही पण लग्न क करताच ती एका मुलीची आई बनली आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द मृणाल हिनेच एका इंटरव्ह्यूदरम्यान केला होता.
सोशल मीडियावर मृणालचा एका व्हिडीओ समोर आला आहे. ‘ ती माझी पहिली मुलगी आहे. आता मला जे मूल होईल ते माझं दुसरं मूल असेल. कारण ती माझी पहिली मुलगी आहे. तसा बाँड डेव्हलप झाला आहे. ती मला यशना किंवा M अशी हाक मारते. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिचे डोळे खूपच बोलके आहेत. तिच्याकडून शिकण्यासारख खूप काही आहे, तो सुंदर अनुभव असतो. तिने मला काय शिकवलंय, याची त्या निरागस मुलीला जाणीवदेखील नाही ‘ असं मृणालने सांगितलं.
कोण आहे मृणालची लेक ?
मृणाल ठाकूर ज्या मुलीला तिची पहिली मुलगी म्हणते ती दुसरी-तिसरी कोणी नाही तर बाल कलाकार कियारा खन्ना आहे. मृणाल आणि कियाराने साऊथच्या ‘हाय नन्ना’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात मृणाल यशनाच्या भूमिकेत दिसली होती तर कियाराने माहीची भूमिका साकारली. चित्रपटाच्या सेटवर दोघींमध्ये चांगली मैत्री झाली त्यानंतर मृणालने दोघींचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
कियारालाही खूप आवडते मृणाल
कियारा आपली मुलगी आहे असं सांगणारा मृणालचा जो व्हिडीओ आहे, तो स्वतः कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘ तू आयुष्याचा भाग झाल्याने मी खूप आभारी आहे एम. माझं तुझ्यावप खूप प्रेम आहे आणि मला तुझी खूप आठवण येते. लवकरच भेटूया’ असे तिने त्यात नमूद केलंय