Mumbai BMC Election : मुंबई BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, ‘या’ नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
मुंबई बीएमसी निवडणुकीत भाजपने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. नवनाथ बन मानखुर्द शिवाजी नगरच्या प्रभाग क्रमांक १३५ मधून, तर नील सोमय्या मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून अर्ज दाखल करणार आहेत. तजिंदर सिंग तिवाना, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि जितेंद्र पटेल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने युवा चेहऱ्यांवर विश्वास दर्शवत अनेक नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. ही एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. मानखुर्द शिवाजी नगरच्या प्रभाग क्रमांक १३५ मधून नवनाथ बन हे आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर, वॉर्ड क्रमांक ४७ मधून तजिंदर सिंग तिवाना यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल हे वॉर्ड क्रमांक १० मधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून नील सोमय्या यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नील सोमय्या हे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र असून, ते दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांच्या मिश्रणातून बीएमसी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on: Dec 29, 2025 12:56 PM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
