Mrunmayee Deshpande : नाना काकांनी रट्ट्कन मला फटका मारला…मृण्मयी देशपांडेनं सांगितलेला ‘नटसम्राट’ सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा

Mrunmayee Deshpande On Nana Patekar : मृण्मयी देशपांडेनं एका जुन्या मुलाखतीत 'नटसम्राट' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. काय म्हणालेली अभिनेत्री? जाणून घ्या.

Mrunmayee Deshpande : नाना काकांनी रट्ट्कन मला फटका मारला...मृण्मयी देशपांडेनं सांगितलेला नटसम्राट सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा
| Updated on: Oct 14, 2026 | 3:10 PM

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं गोवा येथे वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच नाना यांच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. इतकंच नव्हे तर यापूर्वीही काही कलाकारांनी नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या मुलाखतीही व्हायरल होत आहेत. नाना पाटेकर यांचा ‘नटसम्राट‘ हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही हा सिनेमा आवर्जून पहिला जातो. या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं नाना पाटेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. एका जुन्या मुलाखतीत मृण्मयीनं नाना पाटेकर यांच्यासोबत ‘नटसम्राट‘ या सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला होता.

मृणमयी देशपांडेनं सांगितला प्रसंग

Loading...

‘नटसम्राट‘ या सिनेमात एका सीनमध्ये मृण्मयी, नवऱ्याचे पैसे सापडत नसतात म्हणून नानांची खोली तपासायला जाते. आपल्या नवऱ्याचे पैसे वडिलांनी घेतले, असा संशय तिला येतो. त्यामुळे, ती नानांची ट्रंक तपासते. या सीनच्या शूटिंगदरम्यानचा त्या ट्रंकमध्ये काय आहे, हे बघण्याची उत्सुकता मृण्मयीला होती. याबद्दल बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की, ‘पहिल्यांदा जेव्हा सीन केला तेव्हा, त्या ट्रंकेत काय आहे, असं मी विचारलं. तेवढ्यात नाना काकांनी रट्ट्कन मला फटका मारला. त्यांचा हात लागला आणि ऊई ऊई करायला लागले.’

‘त्यावर ते म्हणाले, इथे हाथ कशाला वापरायला पाहिजे? सगळा हातांनी अभिनय करणार आहेस का? त्या सिनेमामध्ये आपल्या हालचालीतून गोष्टी लक्षात येतात, पण पुढच्या सीनमध्ये त्या ट्रंकेत काय आहे, हे मला बघायचं होतं, पण मी हात मागे घेतला. म्हटलं, पुन्हा हा फटका परवडणारा नाहीये.’ असं मृण्मयीनं शेवटी सांगितलं. ‘दूरदर्शन‘ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत मृण्मयी देशपांडे बोलत होती.

दरम्यान, ‘नटसम्राट‘ हा सिनेमा 1 जानेवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेला. या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, अजित परब, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us