AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करण्याऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता

Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. याचा अनेकांनी विरोध केला आहे. तर यावर मराठमोळ्या अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.

माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करण्याऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
| Updated on: Aug 21, 2026 | 1:30 PM
Share

Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना किमान मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर मराठी भाषा येत नसेल तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून चालकांना परवानाच रद्द करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाला काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी विरोध केला आहे. यावर याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आणि अभिनेता पुष्कर जोग याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

इन्स्टाग्रामवर पुष्कर जोग याने स्टोरी शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेता संताप व्यक्त करत म्हणाला, ‘मुंबई मराठी माणसाच्या बापाची, माज दादागिरी तुमच्या राज्यात… अरे जे राज्य तुम्हाला अन्न देतंय, रोजगार देतंय, पैसे देतंय, मान सन्मान देतंय, निदान त्याची तरी किंत ठेवाय.’ पुढे अभिनेता लिहित, ‘हम नहीं बोलेंगे मराठी, जो उखाड़ना है, उखाड़ लो…’ मग उखाडल्यावर काही बोलू नका…, असं म्हणत पुष्कर याने संताप व्यक्त केला आहे.

सरकारने परप्रांतीय रिक्षाचालकांना 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकण्यास अनिवार्य केले होते. त्यानंतर सरकारकडून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतर अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर काही ऑटो टॅक्सी चालकांनी आम्हाला मराठी बोलणं या वयात शक्य नाही. त्यामुळे आता कारवाई झाली तरी चालेल. आम्ही गावी जाऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

अभिनेता पु्ष्कर जोग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो कायम त्याच्या स्पष्ट भूमिकांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बिग बॉसमध्ये देखील अभिनेता दमदार खेळताना दिसला. आज अभिनेत्याला कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम त्याच्या खसागी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट