AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोपी सैफच्या घरात कसा शिरला? कोणी मदत केली? पोलिसांकडून संपूर्ण खुलासा

वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे. आता नुकतंच याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.

आरोपी सैफच्या घरात कसा शिरला? कोणी मदत केली? पोलिसांकडून संपूर्ण खुलासा
saif ali khan accuse arrest police pc
| Updated on: Jan 19, 2025 | 10:04 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई करण्यात आली. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे. आता नुकतंच याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.

सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी एकाला अटक केल्यानंतर आज सकाळी 9 वाजता डीसीपी दीक्षित गेडाम यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत डीसीपी दीक्षित गेडाम यांनी संपूर्ण माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने आरोपीने घरात प्रवेश केला होता. सैफ अली खान प्रकरणी अटक केलेला आरोपी हा बांगलादेशी आहे. त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

मूळचा बांगलादेशी नागरिक

तो मूळचा बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याने अवैधरित्या भारतात प्रवेश केलेला आहे. तो भारतात आल्यानंतर त्याने नावात बदल केलेला असल्याची शक्यता आहे. विजय दास असे त्याचे आता नाव आहे. हा आरोपी काही महिन्यांपूर्वीच मुंबईत आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. काही दिवस तो मुंबईत राहिला. त्यानंतर तो पुन्हा मुंबईच्या बाहेर गेला आणि आता १५ दिवसांपूर्वीच तो मुंबईत परतला. तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

१६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. त्याचे वय ३० वर्ष असे आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न होत आहे. चोरीच्या उद्देशानेच आरोपीने घरात प्रवेश केल्याचं आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, असेही पोलिस म्हणाले.

पोलीस कोठडीची मागणी करणार

या आरोपीला न्यायलयात दाखल करुन त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत. यानंतर पुढील चौकशी करणार आहोत. या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याची उत्तर आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेले आहे, त्या अनुषंगाने प्रथम दर्शनी असे वाटतंय की तो बांगलादेशी नागरिक आहे. सध्या आम्ही याचा पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल