'सूर्यवंशम'मध्ये 'टिप टिप बरसा पानी'चा रिमेक, जावेद अख्तर भडकले

बॉलिवूडचे जेष्ठ्य संगीतकार आणि लेखक जावेद अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या जावेद अख्तर यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशम' चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रीमेक व्हर्जनवर आक्षेप घेतला आहे.

'सूर्यवंशम'मध्ये 'टिप टिप बरसा पानी'चा रिमेक, जावेद अख्तर भडकले

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ्य संगीतकार आणि लेखक जावेद अख्तर अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या जावेद अख्तर यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रीमेक व्हर्जनवर आक्षेप घेतला आहे. कॉपीराइटचे उल्लंघन केल्यामुळे हे रीमेक गाणं बंद करावे., असं जावेद अख्तर म्हणाले. यापूर्वीही अख्तर यांनी ‘पापा केहते है’ चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ गाण्याच्या रीमेकवर कॉपीराईटच्या अधिकाराखाली नोटिस पाठवली होती.

दिग्दर्शक रोहीत शेट्टींचा चित्रपट सूर्यवंशमसाठी 1984 चा प्रसिद्ध चित्रपट ‘मोहरा’मधील रोमँटिक गाणे ‘टिप टिप बरसा पानी’चे रीमेक करण्यात आले आहे. गाण्याच्या शूटिंगपूर्वीच रीमेकची चर्चा सुरु होती. पण गाण्याची शूटिंग होताच जावेद अख्तर सूर्यवंशमचे दिग्दर्शक रोहीत शेट्टीवर भडकले आहेत. हे गाणं लवकरात लवकर बंद करावे, असंही जावेद अख्तर यांनी चित्रपटाच्या टीमला सांगितले.

“मला खंत वाटत आहे की, टिप टिप बरसा पानी गाण्याचे लेखक आनंद बख्शी साहेब या गाण्याचा विरोध करण्यासाठी आज आपल्यात नाही. आजचे संगीतकार प्रसिद्ध गाण्यांचे बोल बदलून टाकतात. हे सर्व चुकीचे आहेठ, असे म्हणत अख्तर यांनी बोल बदलणाऱ्यांवर आक्षेप घेतला.

मोहराचे गाणं टिप टिप बरसा पानीला 19 वर्षा पूर्वी अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडनला घेऊन शूट करण्यात आले होते. आता या गाण्याच्या रीमेकमध्ये अक्षय कुमार आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ रोमान्स करताना दिसणार आहेत.

नवीन रीमेक गाण्याचे व्हर्जन तनिष्क बागची याने कंपोज केले आहे. फराह खान यामध्ये कोरिओग्राफ करत आहे. लवकरच सूर्यवंशम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील येईल, असंही म्हटलं जात आहे. पण अद्याप चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालेली नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *