
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनी गर्लफ्रेंड झैनब रावदजीशी लग्न केलंय. नागार्जुन यांनी सोशल मीडियावर या खास लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

'आमला आणि मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आमच्या मुलाने झैनबशी एका सुंदर समारंभात लग्न केलंय. पहाटे 3.35 वाजता हा लग्नसोहळा पार पडला. आमच्याच घरी लग्नाचे विधी पार पडले', असं नागार्जुन यांनी लिहिलंय.

प्रेम, हास्य आणि आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत आम्ही हे एक सुंदर स्वप्न पूर्ण होताना पाहिलंय, अशा शब्दांत ते व्यक्त झाले. अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी आमला यांचा मुलगा आहे. नाग चैतन्य हा त्याचा सावत्र भाऊ आहे.

अखिलने याआधी 2016 मध्ये श्रिया भुपालशी साखरपुडा केला होता. 2017 मध्ये दोघं लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला.

झैनाब ही उद्योगपती झुल्फी रावदजी यांची मुलगा आहे. झुल्फी यांचं बांधकाम व्यवसायात मोठं नाव आहे. झैनाब स्वत: एक कलाकार असून ती भारत, दुबई आणि लंडन अशा तिन्ही देशात राहिली आहे.