Nana Patekar : लाज नावाची गोष्टच नाही…, ‘नाना पाटेकर जिवंत, अन्…’, तनुश्रीच्या दाव्यावर भडकले नेटकरी
Nana Patekar : अभिनेत्री नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री गंभीर आरोप करत आहे. आता तिने धक्कादायक दावा केला आहे. 'नाना पाटेकर जिवंत आहेत...', असा दावा केला... ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Tanushree Dutta On Nana Patekar: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 8 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि इंजस्ट्री पोरकी झाली. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी नानांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. पण अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आरोप करताना दिसतेय. आता तर अभिनेत्री नाना पाटेकर यांच्या निधनावर मोठा दावा केला आहे. मला वाटतं की ते सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असू शकतात. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मृत्यूचं नाटक रचलं असावं आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं असावं….’, असा धक्कादायक दावा तनुश्री हिने केला आहे. यावर नेकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ कमेंट करत अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘लाज नावाची गोष्टच उरली नाही तिच्यात…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जो या जगातच नाही, त्याच्याबद्दल का बोलत आहेस…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कोण म्हणेल माझी मीस इंडिया होती…’, चौथा नेटकरी म्हणाला, ‘नवीन विषय भेटलाय तिला, आता वर्षभर हेच करणार..’
View this post on Instagram
‘हिच्याकडे काहीच काम नाही, हे तिने दिलेल्या कॅप्शनवून कळत आहे.’, ‘आता कितीही नाटक केलं तरी, तुला सिनेमात काम मिळणार नाही…’, सध्या तनुश्री हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादाबद्दल सांगायचं झालं तर, 2018 मध्ये मीटू मोहिमेअंतर्गत तनुश्री हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमातील गाण्याच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन आणि लैगिंक आत्याकर केल्याचे आरोप तनुश्री हिने केले. पण हे सर्व आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळले होते.
