Nana Patekar: ‘प्रेम करणं प्रचंड गरजेचं कारण…’, नाना पाटेकरांनी सांगितलेलं ‘ते’ वास्तव, डोळ्यात येईल पाणी
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाह्यांचं मनोरंजन तर केलच, पण त्यांनी असंख्या अशा गोष्टी देखील ज्या खरंच सर्वांसाठी फार महत्त्वच्या आहे... एकदा नाना पाटेकर म्हणालेले, 'प्रेम करणं प्रचंड गरजेचं आहे...', पण ते असं का म्हणालेले जाणून घ्या...

Nana Patekar: “100 में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान।”, “आ गए मेरी मौत का तमाशा देखने!” , “सच बोलने वाला हमेशा अकेला होता है… लेकिन सबसे ताकतवर भी वही होता है।”, अभिनेता नाना पाटेकर यांचे अनेक डायलॉग असे आहेत, जे कधीच विसरता येणार नाही. नाना पाटेकर यांनी सिनेमांमध्ये फक्त भूमिका बजावल्या नाहीत, त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका चाहत्यांना काहीतरी नवीन आणि महत्त्वाचं सांगून गेली. नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी कायम चाहत्यांच्या लक्षात राहतील.
सांगायचं झालं तर, एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सर्वांना प्रेम करणं फार गरजेचं आहे… असं सांगितलं होतं. तर नाना पाटेकर नेमकं काय म्हणालेले आणि का म्हणाले होते ते जाणून घ्या. नामा पाटेकर म्हणालेले, ‘प्रेम करणं फार गरजेचं आहे, तुम्ही नाही स्वतःवर प्रेम करणार तर कोण करणार… बाकीचे लोक तुमच्यावर प्रेम करतात नाही करत ते सोडून द्या. स्वतःवर प्रेम करा. मी तर स्वतःवर प्रचंड प्रेम करतो. समोरच्या माझ्याबद्दल काय विचार करतो, त्यापेक्षा मी काय विचार करतो हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. कारण मी स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. मी समोरच्यासोबत खोटं बोलू शकतो. हा जो आरसा आहे, तो आपल्या घरात कायम असला पाहिजे… जो तुम्हाला कायम टोकेल, तुम्ही काय बरोबर केलं आहे आणि काय चुकीचं केलं आहे.’
नाना पाटेकर यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये आयुष्य कसं जगलं पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितलं. सामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतर सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास फार कठीण होता. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केली, नाना पाटेकर यांच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, एका सामान्य कुटुंबात जन्मलेले नाना पाटेकर यांनी आयुष्यात मोठा खस्ता खाल्ला…
नानांनी एका मुलखतीत सांगितलेलं, त्यांचे वडील टेक्सटाइल पेंटिंगमध्ये होते आणि त्यांचा एक छोटा व्यवसाय होता. नाना म्हणालेले, ‘नाटक पाहिल्यानंतर वडील खूप आनंदी व्हायचे आणि मला सपोर्ट करायचे… मी 13 वर्षांचा असताना एका नातेवाईकाने वडिलांची फसवणूक केली आणि त्यांच्या संपत्तीसोबत सर्वकाही घेऊन गेला. त्यानंतर मी देखील वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली..’, आज नाना पाटेकर अनेक तरुणांच्या प्रेरणास्थानी आहेत.
