AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकरांनी घरी जेवायला बोलावलं, मटण खाऊ घातलं अन् नंतर भांडे घासायला लावले, तो प्रसिद्ध निर्माता कोण?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से आता समोर येत आहेत.

Nana Patekar : नाना पाटेकरांनी घरी जेवायला बोलावलं, मटण खाऊ घातलं अन् नंतर भांडे घासायला लावले, तो प्रसिद्ध निर्माता कोण?
Nana Patekar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 3:22 PM
Share

नाना पाटेकर यांचं निधन झालं, नाना पाटेकर यांच्या मृत्यूमुळे चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर यांचं बॉलिवूड सोबतच मराठी चित्रपट सृष्टीत देखील मोठं योगदान आहे. क्रांतिवीर, यशवंत, परिंदा, वेलकम असे एकापेक्षा एक हिट चित्रपट नाना पाटेकर यांनी बॉलिवूडला दिले. तर दुसरीकडे नटसम्राट, पक पक पकाक सारखे मराठी चित्रपट देखील नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हीट केले. नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र चित्रटपटांमध्ये काम करत असतानाच त्यांचे काही किस्से देखील घडले आहेत. नाना जेव्हा कोणतीही भूमिका करत तेव्हा ती परफेक्टच झाली पाहिजे असं ते म्हणत. नाना ज्या चित्रपटांमध्ये भूमिका करत ते पात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर जिवंत करत. नाना यांनी ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, त्या-त्या चित्रपटात त्यांनी साकारलेलं पात्र कायम दर्शकांच्या मानावर कोरलं गेलं आहे.

नाना पाटेकर यांचा एक किस्सा असा देखील आहे की, एकदा त्यांनी एका प्रसिद्ध निर्मात्याला आपल्या घरी बोलावलं होतं. त्याला जेवणाची ऑफर देखील दिली होती. त्याच्यासाठी मटणाचं जेवणं बनवलं अन् त्यानंतर त्याच्याकडून भांडी घासून घेतली. प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील हा किस्सा सांगितला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

परेश रावल नेमकं काय म्हणाले?  

परेश रावल नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की संपूर्ण बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर असा एकमेव कलाकार होता, जेव्हा बॉलिवूडमधील कलाकारांचं मानधन काही लाखात होतं, तेव्हा नाना पाटेकर हे आपल्या भूमिकेसाठी कोटींचा आकडा सांगायचे. मला त्यांचा एक किस्सा आठवतो, एकदा तर त्यांनी एका प्रसिद्ध निर्मात्याला आपल्या घरी जेवण्यासाठी बोलावलं. मटणाचं जेवणं बनवलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी चक्क त्या निर्मात्याला भांडी घासायला लावली. मी त्या निर्मात्याचं नावं इथे सांगणार  नाही, परंतु हे घडलं आहे, असं परेश रावल यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता हा प्रसिद्ध निर्माता कोणं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप