लग्नाच्या दीड वर्षातच नयनतारा-विग्नेशच्या नात्यात दुरावा? एकमेकांना केलं अनफॉलो?

तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नयनतारा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवनने एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा होती. त्या चर्चांमागील सत्य आता समोर आलं आहे.

लग्नाच्या दीड वर्षातच नयनतारा-विग्नेशच्या नात्यात दुरावा? एकमेकांना केलं अनफॉलो?
नयनतारा, विग्नेश शिवनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 3:19 PM

मुंबई : 4 मार्च 2024 | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांना अनफॉलो केल्याचीही चर्चा होती. आता या सर्व चर्चांमागील सत्य समोर आलं आहे. नयनताराचा पती विग्नेश शिवनने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. विग्नेशने पत्नी नयनताराचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोमध्ये नयनतारा तिच्या ‘ब्युटी ब्रँड 9’चं प्रमोशन करताना दिसतेय. विग्नेशने तिची हीच पोस्ट शेअर करत घटस्फोट किंवा नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं म्हटलं जात आहे.

अफवा कशामुळे?

‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नयनतारा आणि विग्नेश शिवनबद्दल एक पोस्ट व्हायरल झाली होती. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं यामध्ये म्हटलं गेलं होतं. या पोस्टनंतर दोघांच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आता विग्नेशच्या या पोस्टनंतर घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्याचप्रमाने नयनतारा आणि विग्नेश यांनी एकमेकांना अनफॉलो केलं नसल्याचंही स्पष्ट झालंय. नयनतारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फक्त 91 लोकांना फॉलो करते आणि त्यापैकीच एक तिचा पती विग्नेशसुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

नयनतारा ही तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नयनताराने प्रियकर विग्नेश शिवन याच्याशी जून 2022 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत.

2015 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी जून 2022 मध्ये लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.